Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईत शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुखांचा राजीनामा

मुंबईत शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुखांचा राजीनामा

महिला शाखा संघटक सुषमा गायकवाड यांनीही दिला राजीनामा

मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वत: शिवसेना भवनात सातत्याने बसून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असून संघटनेत फूट पडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना शाखाप्रमुखांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र शाखा क्रमांक ३ चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि शाखा क्रमांक १२ चे शाखाप्रमुख कौस्तुभ महामुणकर यांनी पदाचा राजीनामा देऊन जोरदार धक्का दिला आहे. तसेच महिला शाखा संघटक सुषमा गायकवाड यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे.

प्रकाश पुजारी यांनी शिवसेना विभागप्रमुख विलास पोतनीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या राजकीय घडामोडी आणि आमचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी असलेले माझे घनिष्ठ संबंध पाहता प्रभागातील पदाधिकारी व शिवसैनिक माझ्याकडे नाहक संशयाने पाहत परस्परात संभ्रमाचे वातावरण तयार करून माझ्याबाबतीत चुकीचे संदेश पोहचवत आहेत. मी याकारणाने माझ्या शाखा प्रमुख पदाचा राजीनामा आपणाकडे सुपुर्त करीत आहे.”

शिवसेना पदाधिका-यांच्या राजीनाम्याची लागण पुढे सुरुच रहाणार का, या चिंताजनक प्रश्नाने शिवसेना नेत्यांची झोप उडाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -