Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीBribe News : दिवाळीचा गोडवा भोवला; भाऊबीज साजरी होणार पोलीस कोठडीत!

Bribe News : दिवाळीचा गोडवा भोवला; भाऊबीज साजरी होणार पोलीस कोठडीत!

पाच लाखांची लाच घेताना दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगांव : दिवाळीचे फटाके फुटत असताना सरकारी अधिकाऱ्यांपासून सर्वसामान्य नागरिक दिवाळीचा व सुट्ट्यांचा आनंद घेत असताना नाशिक विभागातील अँटी करप्शनच्या जळगाव पथकाने आपल्या कर्तव्याचे फटाके फोडत जळगावच्या सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना पाच लाखाची लाच घेताना अटक केली यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांपासून पंचायत समिती व इतर कार्यालयांना पाडव्याची सुट्टी असताना शासकीय अधिकारी कर्मचारी आपापल्या घरी दिवाळी साजरी करीत असताना जळगावमधील पंचायत समिती कार्यालयात मंगळवारी पाडव्याची शासकीय सुट्टी होती. मात्र पाडव्याच्या दिवशी शासकीय कार्यालयात अँटी करप्शन ब्युरो यांनी पाडव्याचे फटाके फोडून लाचखोर यांना जेलची हवा खायला लावली.

जामनेर तालुक्यातील ३८ वर्षीय तक्रारदार हे लोकसेवक आहेत. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशी समितीमध्ये आरोपी तथा विस्तार अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार असलेले रवींद्र शालिग्राम सपकाळे (५४) व विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे (५३) हे चौकशी पथकातील प्रमुख आहेत. तुम्हाला चौकशीतून दोषमुक्त करतो, तुमचा अहवाल चांगला पाठवितो त्यासाठी आम्हाला पाच लाख रुपये लागतील, अशी मागणी ७ नोव्हेंबर रोजी दोघा लाचखोरांनी केली व लाच रक्कम देण्याचे निश्चित झाल्यानंतर लाचखोरांनी दिवाळी पाडव्याचा शासकीय सुटीचा दिवस लाच स्वीकारण्यासाठी निवडला.

एरव्ही सर्वत्र शासकीय सुटी असताना अधिकारी दिवाळीचा आनंद मनवत असताना लाचखोरांनी मात्र पंचायत समितीचे दालन उघडले व तक्रारदाराकडून लाच स्वीकारली. तक्रारदाराने इशारा करताच एसीबीने लाचखोरांच्या मुसक्या बांधल्या. लाचखोरांविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव बाळू मराठे, सुनील वानखेडे, राकेश दुसाणे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक किशोर महाजन, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने यशस्वी केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -