Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीदुबईतून आलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आणखी दोघांना लागण

दुबईतून आलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आणखी दोघांना लागण

उस्मानाबादः दुबईतून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील १३ व २० वर्षीय दोन व्यक्तींना शनिवारी सायंकाळी कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले असुन बावी गावापासुन ३ किमी अंतर रेड झोन तर ७ किमी अंतर बफर झोन जाहीर करण्यात आला आहे.

भारतात ओमायक्रॉनचा धोका वाढत चालला असून महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचे १७ रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम कठोर करण्यात आले आहेत. विदेशातून राज्यात येणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा अॅक्टिव्ह झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत.

शुक्रवारी उस्मानाबाद जिल्हयातील बावी येथे ओमायक्रॉन संशयित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. दुबईतील शारजा येथून भारतात आल्यानंतर त्या प्रवाशाची विमानतळावर चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याची चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यात आल्यानंतर त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. स्थानिक प्रशासनाने याची दखल घेतली असून प्रशासनाने स्वॅब नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहेत.

हा प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह असला तरी तो ओमायक्रॉनचा रुग्ण आहे का? यासाठी जिनॉमिंग सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. येत्या तीन ते चार दिवसात याचा रिपोर्ट येईल अशी माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे. दरम्यान बावी गावात संशयित रुग्णापासून फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. गावातील परिसर सील करण्यात आला.

शनिवारी बावी गावच्या सीमा प्रशासनाने बंद केल्या असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे यांनी हे आदेश काढले आहेत शारजा येथुन आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले २ व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याने हा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -