Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबई-ठाण्यातून शिर्डीचा प्रवास कमी वेळात शक्य

मुंबई-ठाण्यातून शिर्डीचा प्रवास कमी वेळात शक्य

समृद्धीच्या भरवीर ते इगतपुरी टप्प्याचे आज लोकार्पण

नाशिक : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण सोमवार, दि. ४ मार्च रोजी होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा हा तिसरा टप्पा असून, सकाळी ११ वाजता इगतपुरी पथकर प्लाझा, मौजे नांदगाव सदो, ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण होणार आहे.

या तिसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील २४.८७२ कि.मी लांबी एकूण १६ गावांतून जात असून पॅकेज १३ अंतर्गत २३.२५१ कि.मी. व पॅकेज १४ अंतर्गत १.६२१ कि.मी लांबीचा समावेश आहे.

या टप्प्यात पॅकेज १३ अंतर्गत १ व्हायाडक्ट (२०० मी. लांबी), दारणा नदीवरील १ मोठा पूल (४५० मी.), ८ छोटे पूल, वाहनांसाठी ५ भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी ८ भुयारी मार्ग, ९ ओव्हरपास, पथकर प्लाझावरील ४ इंटरचेज, १४ टोलबूथ, २ वे-ब्रिज, १ टनेल-२७५ मी, २७ बॉक्स कल्वर्ट, २७ युटीलीटी डक्ट व पॅकेज १४ अंतर्गत १ व्हायाडक्ट (९१० मी. लांबी), आदी सुविधांचा समावेश आहे.

शेतमाल वाहतुकीच्या कालावधीची बचत

प्रकल्पाच्या या तिसऱ्या टप्प्याचा खर्च रुपये १०७८ कोटी असून या टप्प्याच्या लोकार्पणामुळे ७०१ कि.मी.पैकी आता एकूण ६२५ कि.मी. लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झालेला आहे. समृद्धी महामार्गाच्या उर्वरित मार्गाचे (इगतपुरी ते आमने) काम प्रगतिपथावर आहे. इगतपुरी इंटरचेंजचा वापर करून ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ व जलद होईल व १ तासात शिर्डीला पोहोचता येईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणे व जाण्यासाठी कमी कालावधी लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -