Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीशिंदे गटाचा यंदाचा दसरा मेळावा 'आझाद मैदाना'त होणार!

शिंदे गटाचा यंदाचा दसरा मेळावा ‘आझाद मैदाना’त होणार!

मुंबई : दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्याचा निर्णय शिंदे गटाकडून घेण्यात आला आहे. शिंदे गटाकडून क्रॉस मैदान आणि आझाद मैदान ही दोन मैदानं ठरवण्यात आली होती. पण क्रॉस मैदानावर क्रिकेटच्या मैदानांचे पिच आणि मैदानांवर नियोजन करण्यात अडचणी येत असल्याने आझाद मैदानवर शिंदे गटाचा दसरा मेळावा घेतला जाणार आहे. पोलिसांनी देखील या मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गटाला दिली आहे.

दसऱ्याच्या दिवशी घेण्यात येणाऱ्या मेळाव्यासाठी यंदा देखील ठाकरे आणि शिंदे गटामध्ये शिवाजी पार्क मैदानावरुन वाद निर्माण झाला होता. पण शिंदे गटाने माघार घेत हा मेळावा दुसऱ्या मैदानावर घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर क्रॉस मैदान आणि आझाद मैदान या दोन मैदांनांचा विचार करण्यात आला. मागील वर्षी शिंदेंच्या शिवसेनेने बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा घेतला होता. पण यंदा बीकेसीच्या मैदानावर अनेक कामं सुरु असल्याचे शिंदेंना दसरा मेळावा तिथे घेणं शक्य नव्हतं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -