Share

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै

ईश्वर: सर्व भुतानाम, हिृद्देशेर्जुन तिष्ठति
भ्रामयेन सर्व भुतानी यंत्रणा वृद्धांनी मायया”

मग तुम्ही कुठेही पाहा. वृक्षाकडे पाहा. अरे हा देवाचाच शंकराचा अवतार आहे. आमच्या हिंदू धर्मात फक्त गाईलाच देव मानलेले आहे असे नाही, तर रेड्यालाही आणि गाढवालाही देव मानलेले आहे. कारण त्याच्या ठिकाणी ईश्वर आहे. तो गाढवाच्या ठिकाणी आहे, घोड्याच्या ठिकाणी आहे, तुमच्या ठिकाणी, माझ्या ठिकाणी आहे, सर्व ठिकाणी आहे. संसार सुखाचा करायचा असेल तर बायको, नवरा, मुले, शेजारी यांच्या ठिकाणी हे पाहायला शिका. हळूहळू आपले वलय वाढत जाते. एखाद्या तळ्यात आपण एक लहान दगड टाकला, तर तिथे छोटे वलय निर्माण होते. मग थोडे मोठे वलय असे करता-करता ते संपूर्ण तळ्याला व्यापून टाकते. आपले पहिले वलय कुठले? बायकोला नवरा व नवऱ्याला बायको. पुढे आई-वडील, मुले, सुना, नातू, पणतू या सगळ्यांकडे तो त्या दृष्टीने पाहायला लागतो. हे सर्व देवाची रूपे आहेत, असे तो पाहतो.

संत तुकाराम महाराज काय म्हणतात की, “नरनारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा” ऐसे म्हणजे कैसे. माझ्या कुटुंबातील सर्व माणसे मला विठ्ठल दिसू दे, भगवंत दिसू दे. आपल्या ठिकाणी असलेली दृष्टी फक्त बदलायची. ही दृष्टी बदलली की सृष्टी बदलत नाही, ती आहे तशीच असते. फक्त दृष्टी बदलल्यामुळे ती सृष्टी वेगळी दिसायला लागते. आज आपण संसारात गुंतलेले आहोत.

“गुंतलो होतो अर्जुनगुणे, मुक्त झालो तुझेपणे”
मी पणात गुंतले की, संसाराचा गुंता तयार होतो म्हणून संसार वाईट नाही. संसाराचा गुंता वाईट आहे, हे लोकांना कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “संसार बंधन तोडा वेगी.” बंधन तोड, असे म्हटलेले आहे. संसार सोड असे म्हटलेले नाही.

“आपुले आपण करा सोडवणं संसार बंधन तोडा वेगी” बंधन तोडायचे आहे, संसार कुठे वाईट आहे. आधी सांगितल्याप्रमाणे, “नरनारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा”

सुरुवात कुटुंबापासून. पहिले वलय, दुसरे वलय नरनारी बाळे असे करता-करता वलय मोठे होते, किती मोठे होते ?
“हे विश्वची माझे घर, ऐसी माती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणचि जाहला”
किंबहुना या शब्दाला अधोरेखित करायचे. चराचर आपणाचि जाहला, याला साक्षात्कार म्हणतात. नाही तर साक्षात्कार म्हणजे कशालाही समजतात व मूर्खासारखे कशाच्याही मागे धावत सुटतात.

परमेश्वर हा विषय किती महत्त्वाचा आहे, याचा जर उलगडा झाला, तर संसार सुखाचा होतो. परमार्थ सार्थ होतो आणि जीवनामध्ये आनंदी आनंद होतो. म्हणून परमेश्वर हा विषय समजावून घ्यायचा की नाही घ्यायचा, हे तू ठरव.
कारण “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.”

Recent Posts

Chandrashekhar Bawankule : भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं हा उद्धव ठाकरेंचा नतद्रष्टेपणा!

सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भगव्याचा अवमान केला चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात मुंबई :…

28 mins ago

Monsoon Trip : काही दिवसांवर येऊन ठेपला पावसाळा; ‘या’ ठिकाणी जायचा आत्ताच बेत आखा!

मुंबई : पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच आता निसर्गप्रेमींचे पावसाळी पिकनिकचे प्लॅन…

36 mins ago

Beed cash seized : बीडमध्ये पोलीस निरीक्षकाच्या घरी सापडली १ कोटींची रोकड!

९७० ग्रॅम सोने आणि ५ किलो चांदीही केली जप्त बीड : बीड शहरातील एक कोटी…

1 hour ago

Cinema Hall Shut Down : दहा दिवस चित्रपटगृह राहणार बंद!

जाणून घ्या नेमकं काय आहे कारण मुंबई : कलाविश्वाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली…

1 hour ago

Mumbai Water Shortage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! कडाक्याच्या उन्हात पाणीटंचाईचा प्रभाव

'या' भागातील चक्क १६ तास पाणीपुरवठा खंडित मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरीय क्षेत्रांमध्ये उकाडा…

2 hours ago

Horoscope : दोन दिवसांत ‘या’ राशीत येणार राजयोग; होणार धनलाभ!

पाहा तुमची रास आहे का यात? मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, दोन दिवसांनंतर अत्यंत शुभ राजयोगाची निर्मिती…

3 hours ago