Monday, May 20, 2024
Homeमहत्वाची बातमी'...तर उद्धव ठाकरे वाऱ्याने उडून गेले असते'; नितेश राणेंचा हल्लाबोल

‘…तर उद्धव ठाकरे वाऱ्याने उडून गेले असते’; नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : काल मुंबईतील बीकेसी मैदानात शिवसेनेची जाहीर सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून फटकारले आहे. त्यानंतर भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी “आपले अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्री केंद्रावर टीका करत आहेत. आज राज्यातील मुलं बेरोजगार आहेत आणि तुम्ही असं वक्तव्य करत असाल तर त्याला काय अर्थ आहे.” असे म्हणत फडणवीसांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले की “तुम्ही दुसऱ्यांच्या वजनावर बोलता तर तुमच्या मुलाच्या आवाजावर वक्तव्य केले तर वाईट का वाटते? तुम्हीही तुमच्या वजनाने वाऱ्याने उडून गेले असते, असे म्हटले तर चालेल का?’.

“स्वत:च्या कुटुंबाची बदनामी मुख्यमंत्र्यांनी करून नये. तुमच्या नाकाखाली साधुंची हत्या होते, दंगली होतात, वीजेचा प्रश्न आहे, राज्यात इतके मुद्दे असतानागी त्यावर तुम्ही काही बोलत नाहीत अन् हिंदुत्वावर बोलताय, तुमच्या बुडाखालचा अंधार बघा. आपलं अपयश झाकण्यासाठी तुम्ही केंद्रावर टीका करता पण केंद्रामुळे तुम्हाला काही सुविधा मिळता त्यावर का बोलत नाहीत.” असा आरोपही त्यांनी केला.

भोंग्यांच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे राज यांना नेमकं कसे उत्तर देतात हे महत्त्वाचे असणार आहे. मोठा गाजावाजा करून अखेर सुपरडुपर फ्लॉप झालेल्या सिनेमासारखं हे भाषण झालं आहे. राज्यातील लोकांना या सभेबद्दल उत्सुकता होती, पण मुख्यमंत्र्यांच भाषण ऐकल्यावर सगळ्यांची निराशा झाली.

हिंदुत्वासाठी तुम्ही काय केलंय? बाबरी तर पाडली नाहीच, ती आमच्या शिवसैनिकांनी पाडली असे ते म्हणाले. “तुम्ही आमच्यावर खोटेनाटे आरोप करत असाल, धमक्या देत असाल तर आमचे नेते त्याला उत्तर देणारंच. आम्ही गप्प बसणारे लोकं नाहीत, तुम्ही वाघनखं दाखवा, बोटं छाटा पण तुम्ही फक्त पोलिसांना बाजूला करा मग कुणाचे किती बोटं राहतात आपण बघून घेऊ.” असा इशारा शिवसेनेला करत आजच्या भाजपाच्या सभेत पक्षाचे नेते शिवसेनेला उत्तर देणार असल्याचं नितेश राणे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -