Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीborder dispute : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद सुरू असतानाच दोन्ही सरकार 'यासाठी' एकत्र येणार

border dispute : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद सुरू असतानाच दोन्ही सरकार ‘यासाठी’ एकत्र येणार

शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे जिर्णोद्धार होणार

मुंबई : कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये सीमावादाची (border dispute) लढाई सुरू असतानाच ही दोन्ही राज्ये कर्नाटकातील शहाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार करण्यासाठी एकत्र येणार आहेत. कर्नाटकातील शहाजी महाराजांच्या समाधी स्मारकाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र सरकार कर्नाटकसोबत हातमिळवणी करणार आहे. त्यासंबंधी भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संकेत दिले आहेत. महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला असून कर्नाटक सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

Shahajiraje Samadhi

शहाजी महाराज यांचे निधन २३ जानेवारी १६६४ साली कर्नाटक राज्यातील होदिगेरे जिल्ह्यात झाले. इथेच शहाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे. शिवरायांचे प्रेरणास्थान असलेल्या शहाजीमहाराजांची समाधी कर्नाटकात उघड्याबोडक्या अवस्थेत आहे. शहाजी महाराजांसोबत कर्नाटकात गेलेल्या काही मराठ्यांचे वशंज आजही नित्यनेमाने या समाधीस्थळाला भेट देतात. शहाजी महाराजांचे समाधी स्थळ आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या यादीत असले तरीही या स्थळाचा विकास मात्र हवा तसा अजूनही झाला नाहीये. याकडे महाराष्ट्र सरकारने लक्ष वेधले आहे. तसेच, समाधीचा जिर्णोद्धार करण्याचा सरकारचा प्रयत्न असून लवकरच चंद्रकांत पाटील कर्नाटक सरकारकडे प्रस्ताव सादर करणार आहेत.

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन दोन्ही राज्याकडून करण्यात आलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरुन वातावरण तापले असतानाच महाराष्ट्र सरकारने सीमाभागांवर राहणाऱ्या लोकांसाठी योजना आणल्या आहेत. यामध्ये कर्नाटकात राहणाऱ्या लोकांना मराठी शिकण्यास मदत होणार आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे. सरकार सीमाभागातील नागरिकांसाठी काही विशेष योजना आखत आहोत. मुंबईत त्यासंबंधी बैठका घेत आहोत. शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा जिर्णोद्धार करण्यासाठी सरकार पुढाकार घेत आहे. त्यासाठी कर्नाटक सरकारकडे प्रस्ताव सादर करणार आहोत. तसेच, स्मारकासाठी आवश्यक असलेली रक्कम कर्नाटक सरकारकडे सुपूर्द करण्यात येतील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

मराठी शाळांची बांधणी, मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांची भरती तसेच कर्नाटकातील शहाजी महाराजांच्या समाधीचे स्मारक बांधण्यासंदर्भातील बोलणी कर्नाटक सरकारसोबत करण्यात येणार आहेत. यातून दोन्ही राज्यांतील कटुता कमी होऊन सहकार्याची भावना वाढीस लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -