Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजblind love : आंधळ्या प्रेमात तरुणाचा करुण अंत

blind love : आंधळ्या प्रेमात तरुणाचा करुण अंत

समाज माध्यमात प्रेमाची व्याख्या बदलत चाललेली आहे. त्यापेक्षा असं म्हणता येईल की, प्रेमाला आता काही व्याख्याच राहिलेली नाहीये. (blind love) प्रेम या सुंदर शब्दाने आजपर्यंत जग जिंकलेले आहे. पण, आज अशी परिस्थिती आहे की प्रेम हा शब्द तरुणांचे जीव घेत आहे, ही बदलत चाललेली परिस्थिती, या आंधळ्या प्रेमासाठी अनेकांनी आपले जीव गमावले आहेत व गमवतही आहेत.

सिद्धांत हा अतिशय हुशार असा मुलगा. आई-वडील, एक बहीण आणि भाऊ आणि सर्वात लहान असा सिद्धांत. आई-वडील खानदानी श्रीमंत. त्यामुळे सिद्धार्थला कुठल्याच गोष्टीची कमतरता कधीही भासली नाही. एखादी गोष्ट आई-वडिलांकडे मागायच्या अगोदरच त्याला मिळत असे. अशा श्रीमंतीत तो वाढला. वाढत्या व्यापारामुळे आई-वडिलांनी निर्णय घेतला की, सिद्धांतला होस्टेलला शिक्षणसाठी ठेवायचे, जेणेकरून त्याचे व्यवस्थित शिक्षण होईल. तिघा मुलांपैकी आपला एक मुलगा चांगला सुशिक्षित होईल, असं आई-वडिलांना वाटलं. वाढत असलेल्या व्यापारामुळे दोघाही आई-वडिलांना आपल्या मुलांकडे नीट लक्ष देता येत नव्हतं, त्यामुळे आई-वडिलांनी हा निर्णय घेतला व सिद्धार्थ लहान असल्यापासून होस्टेलला शिक्षण घेऊ लागला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर. त्याला पुढचं उच्चशिक्षण घेण्यासाठी. त्याने होस्टेललाच राहण्याचा निर्णय घेतला. पण त्याला आता घरापासून लांब होस्टेलला राहण्याची सवय झालेली होती. त्याला स्वातंत्र्य आयुष्यात जगण्याची सवय झालेली होती. तोपर्यंत त्याचं वय वीसपर्यंत झालेलं होतं. तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागलेला होता.

ज्या हॉस्टेलवर तो राहत होता, त्याच होस्टेलमध्ये साफसफाई व इतर काम करण्यासाठी, रेखा ही तीस वर्षे विधवा स्त्री येत होती. तिला दोन लहान मुली होत्या. त्या मुलींना मोठे करण्यासाठी तिने साफसफाईचे काम सुरू केलेले होते आणि त्यासाठी ती हॉस्टेलवर दररोज येत होती. त्यामुळे सिद्धांत आणि रेखा हिची ओळख वाढत गेली. रेखाच्या आपलेपणाच्या बोलण्यातून तो तिच्याकडे आकर्षित होऊ लागला आणि दोघेही एकमेकांच्या केव्हा प्रेमात पडले हे दोघांनाही समजले नाही. पण ज्यावेळी सुट्टीत सिद्धांत घरी येत नव्हता आणि सतत पैशाची मागणी करत होता. त्यावेळी आई-वडिलांना कुठेतरी काहीतरी चुकतंय याची जाणीव होऊ लागली. आणि त्यावेळी आई-वडिलांनी सिद्धांतला कायमचा आमच्या सोबत ये असं सांगितलं. त्यावेळी साहजिकच सिद्धांतने आई-वडिलांचा हा निर्णय अमान्य केला. आपला मुलगा आपल्यापासून एवढा का दुरावला गेलेला आहे, हे आई-वडिलांना समजेना. सिद्धांत अनेक वेळा बोलला होता कधी शिक्षण संपते आणि मी कधी तुमच्या सोबत राहायला येतो, असं मला झालेलं आहे. असे बोलणारा सिद्धांत आता परत येण्यास नकार का देतोय हा आई-वडिलांना प्रश्न पडला. त्याची कसून चौकशी केली, त्यावेळी त्याने कबूल केले की तो प्रेमात पडलेला आहे आणि प्रेमाखातर तू पुन्हा आई-वडिलांकडे येऊ इच्छित नाहीये.

आई-वडिलांना आनंद झाला की, आपल्या मुलाला कोणीतरी सोबती मिळालं. पण ज्यावेळी त्यांना हे समजले की, आपला मुलगा कुठल्या तरुणीच्या प्रेमात पडलेला नसून एका दोन मुलांच्या विधवा स्त्रीच्या प्रेमात पडलेला आहे. तेव्हा ने सिद्धांतच्या आई-वडिलांना धक्का बसला. त्यामुळे आई-वडिलांनी या नात्याला परवानगी दिली नाही, कारण सिद्धार्थ जेमतेम वीस वर्षांचा होता आणि रेखाही तीस वर्षांची होती आणि एवढेच नाही तर तिच्या पदरामध्ये दोन मुले होती. त्यावेळी सिद्धांतने निर्णय घेतला की तो रेखासोबत लग्न करून कायमचा तिच्यासोबत राहणार आहे आणि आपल्या आई-वडिलांनी भावंडांसोबत असलेले नाते सिद्धांतने कायमचे तोडले. सिद्धांत रेखासोबत राहू लागलेला होता. एक दोन वर्षं निघून गेली आणि अचानक एक दिवस सिद्धांतच्या आई-वडिलांना फोन आला की, सिद्धांतने आत्महत्या केलेली आहे. असं नेमकं काय झालं, सिद्धांतवर आत्महत्या करण्याची वेळ का आली. रेखासोबत राहण्याचा निर्णय सिद्धांतचा होता. एवढं टोकाचे पाऊल का उचललं. सिद्धांतने ज्यावेळी निर्णय घेतला. त्यावेळी रेखाच्या प्रेमात सर्व जग विसरलेला होता. ती वयाने मोठी आहे. ती दोन मुलांची आहे. ती विधवा आहे. या गोष्टींचा त्यावेळी त्याच्यावर फारसा परिणाम झाला नव्हता. तिचे माझ्यावर आणि माझे तिच्यावर प्रेम आहे. याच गोष्टीचा त्याने विचार केला होता. पण ज्यावेळी त्याने लग्न केले, त्यावेळी रेखाचे वाढत चाललेले वय, तिची दोन मुले व सिद्धार्थचे अपूर्ण राहिलेले शिक्षण त्याला आर्थिक अडचणीमुळे पूर्ण करता येत नव्हते आणि सहाजिकच त्यामुळे त्याला कुठे नोकरी लागत नव्हती. कमी वयामध्ये लग्न करण्याचा घेतलेला निर्णय हा सिद्धार्थ कुठेतरी चुकला. रेखा सगळीकडे घर काम करून. सिद्धार्थला पोसत होती. त्यांच्यात खटके उडायला लागलेले होते. आई-वडिलांमुळे सिद्धार्थला आजपर्यंत कधी आर्थिक अडचण भासली नव्हती. अाता त्याला आर्थिक अडचण भासू लागली होती, आणि ती रेखा आज त्याला हिडीस फिडीस करत होती. कारण रेखाला कळून चुकलं होतं की, आपण एका श्रीमंत मुलाला फसवलेलं होते. पण, आता त्याच्या श्रीमंतीचा आपल्याला काहीही फायदा होत नाहीये. उलट आपल्यालाच त्याला पोसावं लागत आहे. ती त्याला त्रास द्यायला लागली होती. या सगळ्या गोष्टींचा परिणाम सिद्धार्थवर झाला. आपण केलेल्या चुकीची तो माफी कोणाकडेच मागू शकत नव्हता आणि म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचललेले होते. आई-वडिलांनी कदाचित त्याला माफ केले असते. कुठल्या तोंडाने माफी मागावी, असं कदाचित सिद्धार्थला झालं असावं. प्रेमामधल्या आकर्षणामुळे आंधळे प्रेम निर्माण झाले आणि हुशार मुलाचा अंत या आंधळ्या प्रेमाने झाला.

(सत्य घटनेवर आधारित)

-अॅड. रिया करंजकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -