Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमीठाकरे सरकारची करकपात म्हणजे शुद्ध फसवणूक

ठाकरे सरकारची करकपात म्हणजे शुद्ध फसवणूक

मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ देवेंद्र फडणवीसांची गंभीर टीका

मुंबई (प्रतिनिधी) : ‘महाविकास आघाडी सरकारने गाजावाजा करीत ‘राणाभीमदेवी’ थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी केल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे’, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला. ‘महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतलेला नसून केंद्राने घेतलेल्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम असून केंद्राच्या निर्णयामुळे पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झाले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली. महाराष्ट्र शासनाच्या ‘डीजीआयपीआर’ ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली. मात्र सरकारने प्रत्यक्षात असा कोणताच निर्णय घेतला नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

इंधनाची मूळ किंमत, विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन, रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस तसेच अॅग्रीकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते. त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मे महिन्यात ‘एप्रिल फूल’!

महाराष्ट्रात पेट्रोलवर २.०८ रुपये आणि डिझेलवर १.४४ रुपये कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे. स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे. महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी मागणी आहे. कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -