Saturday, May 18, 2024
Homeदेशमहसूल गुप्तचर संचालनालयाने सोने तस्करीचे प्रयत्न हाणून पाडले

महसूल गुप्तचर संचालनालयाने सोने तस्करीचे प्रयत्न हाणून पाडले

मुंबई, लखनऊ येथून ५.८८ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने केले जप्त

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गेल्या आठवड्यात लखनऊ आणि मुंबई येथे सलग दोन वेळा यशस्वी कारवाई करून हवाई मार्गाने संघटितपणे होणाऱ्या सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न हाणून पाडले आहेत. ज्यात सोने लपवून नेण्याची सामान्य पद्धत वापरली होती.कारवाईसाठी अचूक रूपरेषा निश्चित करून, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दुबईहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, एअर कार्गो कॉम्प्लेक्स, येथे आलेल्या मालाची तपासणी केली.

आयात माहिती कागदपत्रांत याची नोंद, “वेगवेगळे सुटे भाग आणि ड्रम प्रकाराचे सफाई मशीन” म्हणून घोषित करण्यात आले होते, परंतु काळजीपूर्वक तपासणी केल्यावर ३.१० कोटी रुपये मूल्य असलेले ५.८ किलो सोने चकत्यांच्या आकाराच्या स्वरूपात आयात केलेल्या मशीनच्या दोन मोटर रोटर्समध्ये लपवून ठेवलेले आढळले. आयातदार दक्षिण मुंबईतील असून तातडीने कारवाई करून अटक करण्यात आली. या आयातदाराला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

लखनऊमध्ये देखील डीआरआय अधिकाऱ्यांनी मुंबईतील या जप्तीच्या एक दिवस आधी दि. ५ मे रोजी आणखी एका जप्तीची कारवाई केली. त्या प्रकरणात देखील,डीआरआयने लखनऊच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये “इलेक्ट्रिकल थ्रेडिंग मशीन” असल्याचे सांगितलेल्या आयात माल पकडला आणि तिथेही मशिनमध्ये सोन्याच्या चकत्या लपविल्याचे आढळले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -