Monday, May 20, 2024
Homeमहत्वाची बातमीअडीच वर्षांपासून मंत्रालयात नोटा छपाईचा कारखाना सुरू होता

अडीच वर्षांपासून मंत्रालयात नोटा छपाईचा कारखाना सुरू होता

मुनगंटीवारांचा आरोप

मुंबई : नाशिकमध्ये नोटांचा कारखाना आहे हे पाठ्यपूस्तकात होते; पण गत अडीच वर्षे मविआने मंत्रालयात नोटा छपाईचा कारखाना चालू केला, असे सांगत आघाडी सरकारवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले.​ तसेच अजित पवारांनी आम्हाला भीती दाखवू नये, त्यांच्या आमदारांची काय स्थिती होते ते पाहा, असा टोलाही अजित पवारांना लगावला. उद्धव​​​​​​ ठाकरेंनी त्यांच्याच आमदारांना विष्ठा, वराहची उपमा दिली. हे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली.

मुनगंटीवार म्हणाले, दृष्टांचा संहार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बळ मिळो असे म्हणाले. सत्ता गेल्याच्या वेदना आम्हाला दिसल्या. तुम्ही भाजपशी संधान साधले, पहाटे शपथविधी घेतला अन् पुन्हा महाविकास आघाडीत गेले. तूम्हीही उडी मारली. कधी तरी कुणालाही उडी मारावीच लागती. राष्ट्रवादीत आधी होते आता शिवसेनेत जातात कुणीही संत नसते.

आग लावण्याचे काम करू नका

मुनगंटीवार म्हणाले, कोण कधी येईल तूमच्यासह ते सांगता येत नाही. एक दिवस सत्तेविना राहू शकत नाहीत. माचिस घेऊन आग लावण्याचे काम तूम्ही करीत आहात पण तूम्हाला भाजप समजलीच नाही. ज्यांचे आयूष्य घराणेशाही, वंशवाद यात गेली त्यांना त्याग, सेवा, समर्पण काय कळणार, असा टोलाही अजित पवार यांना मुनगंटीवार यांनी लगावला.

रामाला सोईस्कर वापरता

मुनगंटीवार म्हणाले, तू्म्ही मेवा खायचा आणि कार्यकर्त्यांच्या हाती फक्त झेंडा द्यायचा. महाभारत, रामायण सांगताना विचार करा, असा टोलाही त्यांनी लगावला. तूम्ही कौरव आहात, दुर्योधन-दुशाःसनासोबत कर्ण गेला होता पण तूम्ही सोईस्कर रामाला वापरता आणि वरून ते काल्पनिक पात्र असल्याचे सांगता, असा टोलाही त्यांना लगावला.

काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला​​​

मुनगंटीवार म्हणाले, देवानेही पृथ्वीला वाचवण्यासाठी रामाचा अवतार घेतला होता. आधी तुम्हाला राम नको होता आता जे रामनाम घेतात त्यांच्या मांडीला मांडी लावता, असा टोला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरेंवर प्रखर टीका​​

मुनगंटीवार म्हणाले, आमदारांना ठाकरे विष्ठा, वराहची उपमा देत होते, हे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांना शिवसेनेने मंत्री केले अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

सत्तेसाठी राष्ट्रवादी हपापलेली

मुनगटींवार म्हणाले, अजित पवारांनी आमच्यासोबत शपथ घेतली आता आम्हाला पुढे काय होईल असे सांगत आहेत. आम्ही चिंता करीत नाहीत उलट त्यांनीच आता चिंता करावी, असा टोला लगावत मुनगंटीवार यांनी मविआ एक दिवसही सत्तेविना राहू शकत नाही. जल बिना मछली तसेच सत्ताविना राष्ट्रवादी अशा ढंगात त्यांनी टीका केली. मतांसाठी नव्हे तर सत्यासाठी आम्ही काम करीत असल्याचेही ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -