Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीDr. Tatyarao Lahane : डॉ. लहानेंनी ६९८ बेकायदा शस्त्रक्रिया केल्याचा चौकशी समितीचा...

Dr. Tatyarao Lahane : डॉ. लहानेंनी ६९८ बेकायदा शस्त्रक्रिया केल्याचा चौकशी समितीचा गंभीर आरोप

Dr. Tatyarao Lahane : आरोप एकतर्फी असून सर्व शस्त्रक्रिया कायद्याच्या चौकटीतच केल्या – डॉ. तात्याराव लहाने

मुंबई : मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी आरोप करत आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने अहवाल जारी केला असून त्यात तात्याराव लहाने यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. तात्याराव लहाने यांनी जेजे रुग्णालयात ६९८ बेकायदा शस्त्रक्रिया केल्या असल्याचा दावा चौकशी समितीच्या सदस्यांनी केला आहे. त्यामुळे आता डॉक्टर रागिणी पारेख आणि तात्याराव लहाने यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जेजे रुग्णालयातील चौकशी समितीने अहवालात बेकायदा कारभार केल्याचा ठपका ठेवल्यानंतर बोलताना डॉक्टर तात्याराव लहाने म्हणाले की, चौकशी समितीने माझ्यावर केलेले आरोप एकतर्फी असून मी सर्व शस्त्रक्रिया कायद्याच्या चौकटीतच केलेल्या आहेत. माझी कोणतीही चौकशी झालेली नाही. याशिवाय मला चौकशी करताना कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही. राज्य सरकारने आदेश दिल्यानंतरच मी पुन्हा काम सुरू केले होते, असे तात्याराव लहाने यांनी म्हटले आहे. ऑगस्ट ते डिसेंबर २०२२ या कालावधीत रुग्णालयात कोणत्याही पदावर नसताना तात्याराव लहाने यांनी बेकायदा शस्त्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात आला होता.

डॉक्टर तात्याराव लहाने हे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या संचालकपदावरून निवृत्त झाले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून त्यांची अंधत्व निवारण मोहिमेत समन्वयकपदी नेमणूक केली होती. त्यानंतरच त्यांनी बेकायदेशीर शस्त्रक्रिया केल्याचा आरोप चौकशी समितीने केला आहे. याशिवाय नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉक्टर रागिणी पारेख यांनाही चौकशी समितीकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचा संपूर्ण अहवाल रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडे पाठवण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -