Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीHeat stroke : उष्णता वाढली! राज्य सरकारकडून उष्माघातापासून संरक्षणासाठी सूचना जारी

Heat stroke : उष्णता वाढली! राज्य सरकारकडून उष्माघातापासून संरक्षणासाठी सूचना जारी

राज्यात उष्माघाताचे १३ रुग्ण

मुंबई : दिवसेंदिवस राज्यातील तापमानात मोठी वाढ (Temperature increased in Maharashtra) होताना दिसत आहे. सकाळच्या वेळेतही प्रखर ऊन जाणवत आहे. वाढत्या ऊनामुळे घराच्या बाहेर पडणं देखील मुश्किल झालं आहे. नागरिकांना वाढत्या उष्णतेचा त्रास होत असून उष्माघाताच्या (Heatstroke) रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Govt) काही मार्गदर्शक सूचना (Guidelines) जारी केल्या आहेत.

राज्यात यावर्षी उष्माघाताच्या १३ रुग्णांची नोंद झाली आहे. बीडमध्ये (Beed) सर्वाधिक चार रुग्ण तर रायगडात दोन रुग्णांची नोंद झाली आहे. अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे आणि साताऱ्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

उष्माघातापासून संरक्षणासाठी राज्य सरकारच्या सूचना :

१) तुम्हाला तहान लागली नसली तरीही दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्या

२) दिवसाच्या सर्वात जास्त उष्णता असलेल्या वेळेत (सामान्यत: सकाळी उशिरा ते संध्याकाळ) म्हणजे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत घरात किंवा सावलीच्या ठिकाणी राहा.

३) कापसासारख्या कपड्यांपासून बनवलेले हलके, सैल कपडे घाला. गडद रंगाचे कपडे परिधान करणे टाळा.

४) घराबाहेरील, विशेषत: दिवसाच्या सर्वात उष्ण वेळेत (सामान्यत: सकाळी उशिरा ते संध्याकाळ) कामे कमी करण्याचा प्रयत्न करा.

५) तुमच्या चेहऱ्याचे आणि डोळ्यांचे सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी रुंद टोपी आणि सनग्लासेस घाला.

६) कुटुंबातील मुले, वृद्ध सदस्यांवर लक्ष ठेवा, कारण त्यांना उष्णतेशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते.

७) अती घाम येणे, अशक्तपणा येणे, चक्कर येणे, मळमळ होणे ही लक्षणे तुम्हाला किंवा इतर कोणाला आढळल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या. नाहीतर तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो.

काय काळजी घ्यावी?

तुमच्याकडे वातानुकूलन (एयर कंडिशनर) नसेल, तर हवा खेळती राहण्यासाठी पंखे वापरा आणि तुमची राहण्याची जागा थंड करा. स्थानिक हवामान अंदाज आणि अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या तापमानासंबंधीच्या सूचनांकडे लक्ष द्या. दिवसाच्या सर्वाधिक तापमान असलेल्या वेळेत सामाजिक मेळावे घेणं टाळा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -