Sunday, May 19, 2024
Homeदेशदेशातील पहिली खासगी रेल्वे -शिर्डी

देशातील पहिली खासगी रेल्वे -शिर्डी

नवी दिल्ली : भारत गौरव योजनेंतर्गत देशातल्या पहिल्या खाजगी रेल्वेला मंगळवारी कोइमतूर येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही ट्रेन कोइमतूरहून मंगळवारी निघाली असून, ती गुरुवारी शिर्डीत साईनगरला पोहोचेल. या स्पेशल ट्रेनमधून १५०० प्रवासी प्रवास करू शकतात. दक्षिण रेल्वेचे सीपीआरओ बी. गुगनेसन यांनी ही माहिती दिली आहे.

एएनआय या न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, गुगनेसन यांनी सांगितले, की रेल्वेने ही ट्रेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरला २ वर्षांसाठी लीजवर दिली आहे. सर्व्हिस प्रोव्हायडरने कोचच्या सीट्सचे नूतनीकरण केले आहे. या ट्रेनच्या महिन्याला किमान तीन फेऱ्या होतील. या ट्रेनमध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी कोच आणि स्लीपर कोच असे एकूण २० कोच आहेत. शिर्डीला पोहोचण्यापूर्वी ट्रेन तिरुपूर, इरोड, सेलम जोलारपेट, बेंगळुरू, येलाहंका, धर्मावरा, मंत्रालयम रोड आणि वाडी या स्टेशन्सवर थांबेल.

अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, या ट्रेनचे तिकीट दर भारतीय रेल्वेकडून आकारल्या जाणा-या नियमित रेल्वे तिकीट दरांइतकेच आहेत. तसेच, या ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात विशेष व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था केली जाईल. ट्रेनची देखभाल हाउसकीपिंग सर्व्हिस प्रोव्हायडर्स करतील. ते संपूर्ण प्रवासादरम्यान ठराविक वेळेनंतर ट्रेनची साफसफाई करतील. तसेच ट्रेनमध्ये शाकाहारी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

रेल्वे पोलीस दलासह एक रेल्वे कॅप्टन, एक डॉक्टर आणि खासगी सुरक्षा कर्मचारीही या रेल्वेत असतील. रिपोर्टनुसार, या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना स्लीपर नॉन एसीसाठी २,५०० रुपये, थर्ड एसीसाठी ५ हजार रुपये, सेकंड एसीसाठी सात हजार रुपये आणि फर्स्ट एसीसाठी दहा हजार रुपये तिकिटासाठी मोजावे लागतील. दरम्यान, या रेल्वे सेवेच्या निषेधार्थ दक्षिण रेल्वे मजदूर युनियनच्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गटाने शहरातल्या रेल्वे स्थानकावर निदर्शने केली आहेत.

दक्षिणेतल्या राज्यांना शिर्डीशी जोडणारी ही स्पेशल ट्रेन आहे. या सेवेमुळे तामिळनाडू आणि कर्नाटकमधल्या भाविकांना शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी थेट पोहोचता येईल. शिवाय ही पहिलीच खासगी ट्रेन असल्याने या ट्रेनने प्रवास केल्यानंतर प्रवाशांचे अनुभव आणि भावना काय आहेत, ते येत्या काळात समजण्यास मदत होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -