Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीShivasena Vs Thackeray Group : बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरील राडा ठाकरे गटाला भोवला...

Shivasena Vs Thackeray Group : बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरील राडा ठाकरे गटाला भोवला…

शिवाजी पार्क पोलिसांकडून मिळाली नोटीस!

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन (Balasaheb Thackeray Death Anniversary) होता. शिवसेनेत पडलेल्या दोन गटांमुळे या दिवशी राडा होणार हे जणू विधीलिखितच होते. तरीही हा राडा टाळण्यासाठी व स्मृतिदिनाला कोणतेही गालबोट लागू नये याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येलाच शिवाजी पार्क (Shivaji park) येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला वंदन करण्यासाठी दाखल झाले. तरीही ठाकरे गटाने (Thackeray Group) जे करायचे तेच केले आणि दोन्ही गटांमध्ये शिवाजी पार्कवर राडा झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्मृतिस्थळावरुन अभिवादन करून बाहेर पडताच ठाकरे गटाचे अनिल देसाई (Anil Desai) आणि अनिल परब (Anil Parab) बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी तिथे दाखल झाले. परब दाखल झाले आणि याच वेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी केला. ठाकरे गटाने घोषणाबाजी, धक्काबुक्कीला सुरुवात केली असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले. स्मृतिस्थळासमोर सुरू असलेला राडा थांबवण्याऐवजी दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत होते.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. ठाकरे गटाचे पदाधिकारी थोड्याच वेळात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -