जव्हारच्या जुन्या राजवाड्याची अवस्था बिकट

Share

पारस सहाणे

जव्हार : जव्हारच्या जनतेच्या अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या जुन्या राजवाड्याची वास्तू व परिसर बकाल बनला असून नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे येथे गर्दुल्ले, चरसींचा वावर असतो. नगारखान्यावर झाडे उगवली आहेत, त्याची तटबंदी ढासळण्याच्या स्थितीत आहे. जुना राजवाडा भग्नावस्थेत पाहावयाला मिळतो. राजवाड्याची इमारत दुमजली असून तिथे काही वर्षे भारती विद्यापीठ व नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाचे कार्यालय होते.

राजदरबार, उद्याने, पाण्याचा तलाव, घोड्यांच्या पागा, विहीर, भव्य पटांगण, कडेकोट भिंती आणि चारही दिशांनी असणारे बुरुज असे वैभव या राजवाड्याचे होते. सुमारे २१,००० चौ.मी. क्षेत्र असलेला हा जुना राजवाडा आज जव्हार नगरपरिषदेच्या ताब्यात आहे. खुले नाट्यगृह, शिक्षण मंडळाचे कार्यालय, व्यायामशाळा, क्रीडांगण, गणपती सभागृह, पाण्याचे उंच जलकुंभ अशा नागरी सुविधांसाठी या राजवाड्याच्या इमारतींचा वापर केला जातो. ही ऐतिहासिक वास्तू असल्याने पुरातत्व खात्यानेही इकडे द्यावे, अशी मागणी जव्हारवासीय करत आहेत.

या परिसरातील कारागीर आणि जव्हारजवळील न्याहळे येथील कावळ्याचा बांध खाणीतील मजबूत व सुंदर दगडातून हा राजवाडा बांधण्यात आला. पुढे राजे कृष्णशहा यांनी राजवाड्याचा विस्तार करून अतिभव्य असा नगारखाना, गणपती मंदिर व अनेक खोल्यांचा विस्तार केला. आज जव्हारच्या इतिहासाताची साक्ष देणाऱ्या जव्हारमधील जुन्या राजवाड्याची अवस्था बिकट झाली आहे. जीर्णोद्धार होत नसल्याने तटबंदी व इमारत अखेरची घटका मोजत आहे.

जव्हार नगरपरिषदेने नुकतेच शंभर वर्षे पूर्ण करण्याचा मान मिळवला असला तर आजही जव्हारमधील जनता विकासाची वाट पाहत आहे. गेल्या चार वर्षांत शेकडो कोटी रुपये निधी उपलब्ध होऊनसुद्धा जुन्या राजवाड्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले जात नसल्याने जव्हारकर संताप व्यक्त करत आहेत.

त्यामुळे सत्ताधारी जरी कोट्यवधी रुपये निधी आणला असे म्हणत असले तरी मात्र सत्ताचा कार्यकाळ संपण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत, तरीही एकही विकासकाम पूर्ण झाले नाही हे वास्तव आहे.

पहिला राजवाडा हा खरा २६१ वर्षांपूर्वीचा

नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजेसाहेबांनी कृतज्ञतेच्या भावनेतून आपला ऐतिहासिक असा जुना राजवाडा जव्हार नगरपरिषदेला भेट दिला. हल्लीचा जुना राजवाडा या परिसरात सन १७५० साली कृष्णा राजांनी बांधला होता. दुर्दैवाने ७२ वर्षांनी सन १८२० साली तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आज त्या जागी खुले नाट्यगृह आहे. त्यानंतर सन १८२७ मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या राजवाड्याचे बांधकाम, आपला मुलगा पतंगराहा याला राजगादीवर बसवून त्यांच्या नावाने कारभार पाहणाऱ्या राणी सगुणाबाई यांनी सुरु केले.

राजे यशवंतराव मुकणे यांनी मोफत दान केला

जव्हारचे राजे यशवंतराव मुकणे यांनी आपल्या मालकीच्या खूप वास्तू जव्हार नगरपरिषदेस दान स्वरूपात दिल्या. मुकणे यांनी जव्हार नगरपरिषदस मोफत जुना राजवाडा दान केला. मात्र, जव्हार नगरपरिषदेने आजवर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती न केल्याने सदर ऐतिहासिक वास्तू आज अखेरच्या घटका मोजत आहेत. जव्हार नगरपरिषदेने या राजवाड्याच्या विकासासाठी आदिवासी सृष्टी तिथे निर्माण करणार असल्याचे समजते. मात्र, त्याला आजपर्यंत राज्य शासनाने मान्यता दिलेली नाही.

Recent Posts

पाकिस्तानला काँग्रेसचा पुळका

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…

2 hours ago

नियोजनबद्ध कचरा व्यवस्थापन

मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…

3 hours ago

मतदान जनजागृती काळाची गरज

रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…

3 hours ago

MI vs KKR: १२ वर्षांनी वानखेडेवर कोलकाताचा विजय

मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…

5 hours ago

Narendra Modi : बंगालचे नाव तृणमुलमुळे खराब झाले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…

5 hours ago

Vinod Tawde : ‘आयेगा तो मोदीही’ ही भावना मतदार आणि विरोधकांमध्ये निर्माण करण्यात आम्ही यशस्वी!

पुण्यात विनोद तावडे यांचं वक्तव्य पुणे : एनडीए सरकारची (NDA) दहा वर्षाची कामगिरी आणि २०४७…

6 hours ago