Wednesday, May 22, 2024
Homeताज्या घडामोडीदिशा सालियनला ८ जूनच्या रात्री पार्टीतून घरी घेऊन गेलेली ती कार सचिन...

दिशा सालियनला ८ जूनच्या रात्री पार्टीतून घरी घेऊन गेलेली ती कार सचिन वाझेची?

नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे?, नितेश राणेंचा सवाल

आमदार नितेश राणे यांचे खळबळजनक ट्वीट

मुंबई : “दिशाला ८ तारखेच्या रात्री काळ्या मर्सिडीजमधून तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आले. सचिन वाझेकडेही काळी मर्सिडीज आहे जी सध्या तपास यंत्रणांकडे आहे. ही तीच कार आहे का? ९ जूनला त्याला पुन्हा पोलीस खात्यात रुजू करण्यात आले. संबंध?,” अशी शंका नितेश राणेंनी उपस्थित केल्याने दिशा सॅलियनच्या मृत्यू प्रकरणी खूलासा देणा-या विरोधकांची चांगलीच भंबेरी उडाली आहे.

याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूसंबंधी बोलताना काही गंभीर आरोप केले होते. दिशा सालियनची हत्या करण्यात आली असून हत्येआधी बलात्कार करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिले असून आयोगाने पोलिसांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी आता काही ट्वीट करुन सचिन वाझेचा सहभाग होता का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

The car that took Disha Salian home from the party on the night of June 8 belonged to Sachin Vaze

“मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासूनच संशयास्पद राहिली आहे. आणि आता त्यांना दिशा सालियन प्रकरणात अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दिशासोबत राहणारा आणि ८ तारखेच्या रात्री उपस्थित असणारा रोहित राय पुढे येऊन काहीच का बोलत नाही?,” असा सवाल नितेश राणेंना विचारला आहे.

“मुंबईच्या महापौरांनी महिला आयोग आणि त्यानंतर मालवणी पोलिसांना पत्र लिहून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ राज्य सरकारकडून ८ जूनच्या रात्री काहीच झाले नाही, असे दाखवण्यासाठी मोठी तयारी सुरु आहे. चला किमान ते आपली कबर खोदत आहेत याचा आनंद आहे,” असे नितेश राणे यांनी ट्वीट केले आहे.

“मालवणी पोलिसांनी योग्य तपास न केल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. बरोबर ना? आणि आता याच पोलिसांना महिला आयोगाने अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे? हे किती योग्य आहे? नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे?,” अशी विचारणा नितेश राणेंनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला होता. “खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस” आणि आपण कुठे धावणार?,” असे राणेंनी म्हटले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -