Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीजम्मू-काश्मिरातील चकमकीत दहशतवादी ठार

जम्मू-काश्मिरातील चकमकीत दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मिरात आज, शुक्रवारी पहाटे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. अरवानी परिसरात झालेल्या या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. परंतु, सुरक्षा दलांनी या परिसरात शोध मोहिम हाती घेतली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली.

यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अरवानी भागातील मुमनहाल गावात दहशतवादी असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या गावाला वेढा घालून शोध मोहिम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या कारवाईत एक दहशतवादी ठार झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

काश्मीर खोऱ्यात बुधवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या दहशतवादी घटनांमध्ये एक नागरिक आणि एक पोलिस ठार झाले होते. एकीकडे, श्रीनगरमधील नवाकडलमध्ये दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली, तर दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा भागात झालेल्या हल्ल्यात एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला.

दहशतवाद्यांनी बुधवारी संध्याकाळी ६ वाजता श्रीनगरच्या नवाकडल भागात रौफ अहमद नावाच्या व्यक्तीला त्याच्या घराजवळ गोळ्या घातल्या, ज्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला येथील एसएमएचएस रुग्णालयात आणले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काही वेळातच दहशतवाद्यांनी बिजबेहारा रुग्णालयाबाहेर पोलीस एएसआय मोहम्मद अश्रफ यांच्यावर गोळी झाडली, ज्यात ते जखमी झाले. त्यांना श्रीनगरमधील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -