Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाAsian Games 2023: हॉकीमध्ये टीम इंडियाला सुवर्णपदक, जपानला ५-१ने हरवले

Asian Games 2023: हॉकीमध्ये टीम इंडियाला सुवर्णपदक, जपानला ५-१ने हरवले

होंगझाऊ: आशियाई स्पर्धा २०२३मध्ये(asian games 2023) भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. टीम इंडियाने अंतिम सामन्यात गेल्या वेळचा आशियाई स्पर्धेचा विजेता संघ जपानला ५-१ असे हरवले. याआधी पूल राऊंडमध्येही भारत आणि जपान आमनेसामने आले होते. त्यावेळेसही भारताने जपानला ४-२ असे हरवले होते.

अंतिम सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत जपानला नामोहरम केले. भारताने जपानला केवळ एक गोल करण्याची संधी दिली.

या सुवर्णपदकासह भारतीय हॉकी संघाने २०२४मध्ये पॅरिसमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. सामन्याबाबत बोलायचे झाल्यास पहिल्या क्वार्टरमध्ये दोनही संघांना गोल करता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये २५व्या मिनिटाला भारताकडून पहिला गोल करण्यात आला. मनदीप सिंहने हा गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये ३२व्या मिनिटाला भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने दुसरा गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तिसरा क्वार्टर संपण्याच्या आधी अमित रोहिदास भारतासाठी तिसरा गोल केला. या पद्धतीने भारताने तिसऱ्या क्वार्टरपर्यंत ३-० अशी आघाडी घेत आपला विजय पक्का केला.

चौथ्या क्वार्टरमध्ये भारताचे दोन गोल

चौथ्या क्वार्टरच्या सुरूवातीच्या तीन मिनिटांनीच म्हणजेच४८व्या मिनिटाला अभिषेकने भारतासाठी चौथा गोल केला. या गोलसह भारताने ४-० अशी आघाडी घेतली. यानंतर तीन मिनिटांनी म्हणजेच ५१व्या मिनिटाला जपानने आपले खाते खोलले आणि संघाला पहिला गोल केला. सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना भारताने पाचवा गोल केला. ५९व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंहने संघासाठी पाचवा गोल करत जपानविरुद्ध ५- १ असा विजय मिळवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -