Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीFrance: शाळेत चाकूने केलेल्या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू, दोन जण जखमी

France: शाळेत चाकूने केलेल्या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू, दोन जण जखमी

पॅरिस: फ्रान्सच्या एका शाळेत हल्लेखोराने केलेल्या चाकू हल्ल्यात(knife attack) एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे तर इतर दोन जण जखमी झाले आहेत. फ्रांसीस न्यूज चॅनेल बीएफएम टीव्हीने याबाबतची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार ही घटना उत्तर फ्रान्सच्या अर्रास शहरातील आहे येथे शुक्रवारी अचानक एका हल्लेखोराने एका शिक्षकावर हल्ला केला.

बीएफएम टीव्हीच्या माहितीनुसार स्थानिक पोलिसांनी या शाळेत चाकू हल्ला झाल्याच्या गोष्टीला दुजोरा दिला आहे. यासोबतच पोलिसांनी आपल्या विधानात म्हटले की हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये हे सांगण्यात आले की हल्ला करताना हल्लेखोराने धार्मिक घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही.

२० वर्षांचा आहे हल्लेखोर

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार बीएफएम टीव्हीने सांगितले की हा हल्लेखोर २० वर्षांचा आहे. याच शाळेचा तो विद्यार्थी होता. पोलिसांनी या प्रकरणात हल्लेखोरालाही अटक केली आहे. बीएफएम टीव्हीच्या माहितीनुसार या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले शिक्षक फ्रेंच भाषा शिकवत होते.तर आणखी एका शिक्षकही जखमी झाला आहे. या शिक्षकाची स्थिती नाजूक आहे. उपचारासाठी या शिक्षकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनीही घातले लक्ष

या घटनेबाबत फ्रान्सचे मंत्री गेराल्ड डर्मेनिन यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. सोबतच त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली की स्थानिक पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून आता जनतेला कोणताही धोका नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -