Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीTCSने संपवले वर्क फ्रॉम होम कल्चर, सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करण्याची सूचना

TCSने संपवले वर्क फ्रॉम होम कल्चर, सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करण्याची सूचना

मुंबई: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने(tata consultancy service) कोरोनाच्या काळात सुरू केलेल्या वर्क फ्रॉम होम कल्चरला संपवले आहे. यासोबतच कंपनीने आपल्या सर्व ६.१४ लाख कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करण्याची सूचना दिली आहे.

कोरोना महामारीनंतर असे पाऊल उचलणारी टीसीएस ही पहिली मोठी आयटी कंपनी आहे. टीसीएसचे एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सांगितले की कंपनीच्या मते ऑफिसमध्ये बसून काम केल्याने उत्पादनक्षमता वाढते. यामुळेच सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितले आहे.

तीन वर्षात अनेक नवे कर्मचारी दाखल

लक्कड पुढे म्हणाले, आमचा विश्वास आहे की त्यांना कामावर येण्याची गरज आहे ज्यामुळे नवी वर्कफोर्स टीसीएसच्या मोठ्या वर्कफोर्ससोबत इंटिग्रेड होऊ शकेल. ही एक अशी पद्धत आहे ज्यामुळे ते टीसीएसचे मूल्य तसेच पद्धती समजावून घेऊ शकतील. आम्ही कर्मचाऱ्यांना आठवड्यातील सर्व दिवस येण्यास सांगितले आहे. गेल्या तीन वर्षात कंपनीत अनेक नवीन कर्मचाऱ्यांची भर्ती करण्यात आली. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे समान मूल्य असले पाहिजे.

इस्त्रायलमध्ये टीसीएसचे २५० कर्मचारी

टीसीएसने सांगितले की इस्त्रायलमध्ये कंपनीचे २५० कर्मचारी आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे त्यांच्या कारभारावर खास फरक पडत नाही आहे. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत. आमचे प्रमुख ध्येय ही त्यांची सुरक्षा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -