Saturday, May 18, 2024
Homeदेशतामिळनाडूत लॉकडाऊन, रस्त्यांवर शुकशुकाट

तामिळनाडूत लॉकडाऊन, रस्त्यांवर शुकशुकाट

चेन्नई : कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं तामिळनाडूत कडक वीकएंड लॉकडाऊन (lockdown) लागू करण्यात आला आहे. दर रविवारी लॉकडाऊन पाळला जात असून आजचा लॉकडाऊनचा दुसरा दिवस आहे. नागरिक लॉकडाऊनचं पालन करताना दिसत असून चेन्नईच्या रस्त्यावर कोणीही दिसत नाहीये.

तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) कोरोनाची रुग्णसंख्या (Corona) दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी २३ हजार ९७८ रुग्ण आढळून आले. सलग दुसऱ्या दिवशी देखील २३ हजाराच्या वर रुग्णसंख्या आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच शनिवारी तब्बल ११ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि जवळपास ११ हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण वाढत असल्यानं गेल्या ९ जानेवारीपासून तमिळनाडू सरकारने वीकएंड लॉकडाऊन घोषित केला आहे. तसेच निर्बंध आणखी कडक केले आहेत.

नव्या निर्बंधानुसार, रेस्टॉरंट्सना फक्त सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत पार्सल देण्यास परवानगी आहे. तसेच अत्यावश्यक सेवांवर कुठलेही निर्बंध नसून त्यांना त्यांची सेवा २४ तास सुरू ठेवता येईल. दर रविवारी बाजारपेठा, माल्ससह सर्व दुकानांना बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तसेच रविवारी मेट्रो रेल्वेसह उड्डाणे, उपनगरीय आणि इतर ट्रेन ऑपरेशन्स, बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवांवर देखील निर्बंध आहेत. त्यामुळेच आज रस्त्यावर कोणीही फिरताना दिसत नाही. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार केवळ १०० लोकांनाच विवाह सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी आहे.

कोरोनामुळे इयत्ता १ ते ९ पर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर देखील निर्बंध असून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच गेल्या ६ जानेवारीपासून रात्री १० ते ५ दरम्यान रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच १४ ते १८ जानेवारीदरम्यान राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -