Monday, May 13, 2024
Homeक्रीडा2024 T20 World Cup: पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपच्या तारखा जाहीर

2024 T20 World Cup: पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(icc t-20 world cup 2024)-20 वर्ल्डकपला ४ जूनपासून सुरूवात होत आहे. तर या स्पर्धेचा शेवटचा सामना २० जूनला खेळवला जाणार आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४चे सामने अमेरिकेतील फ्लोरिडा, डल्लास आणि न्यूयॉर्कमध्ये खेळवले जाणार आहेत. पहिल्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे यजमानपद अमेरिका करत आहे. याआधी नोव्हेंबर २०२१मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला टी-२० वर्ल्डकप २०२४चे यजमानपद मिळाले होते.

भारत-पाकिस्तान सामना कुठे रंगणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आयजनहावर पार्कमध्ये होऊ शकतो. हे स्टेडियम न्यूयॉर्क शहरापासून ३० मैलावर आहे. याशिवाय टी-२० वर्ल्डकप २०२३मध्ये एकूण २० संघ खेळणार आहेत. या २० संघांना ५-५ च्या संघांना ४ ग्रुपमध्ये विभागावे लागेल. सर्व ग्रुपच्या टॉप २मध्ये संघ सुपर ८ राऊंडसाठी क्वालिफाय करतील. यानंतर ८ संघांना ४-४ ग्रुपमध्ये विभागावे लागेल. दोन्ही ग्रुपचे टॉप २ संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय करतील.

माजी विजेता म्हणून उतरणार इंग्लंड

टी-२० वर्ल्डकप २०२२चे आयोजन ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर झाले होते. या स्पर्धेत इंग्लंडने अखेरच्या सामन्यात विजय मिळवला होता. भारतीय संघाचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपला होता. इंग्लंडने भारतीय संघाला सेमीफायनल सामन्यात २० विकेटनी हरवले होते. भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २००७चा खिताब जिंकला होता. हा टी-२०मधील पहिलाच वर्ल्डकप होता. यानंतर भारताला एकदाही टी-२० वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. दरम्यान, यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची कामगिरी कशी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -