Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीस्वामी विवेकानंद : एक चैतन्य सूर्य

स्वामी विवेकानंद : एक चैतन्य सूर्य

पूर्णिमा शिंदे

एका नव्या युगाचा उदय १२ जानेवारी १८३३ रोजी झाला; ते चैतन्यरूपी नरेंद्र योगेश्वर विवेकानंद. विवेकानंद हे नाव त्यांना खेत्रीचे महाराज अजित सिंह यांनी दिले. याचे असे कारण की, सारेच विवेकानंदांच्या वाणीचे माधुर्य, बुद्धिचातुर्य, वृत्तीचे औदार्य आणि रूपाचे सौंदर्य यांनी आकर्षित केले होते. परमार्थाचे पसायदान गाणारे व मानवजातीचे श्रेष्ठ हितकर्ते व अलौकिक प्रतिभेचे साधूपुरुष म्हणून विवेकानंद वंदनीय होते.

अध्यात्माची बैठक आणि विज्ञानाची दृष्टी लाभलेले विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. गुरूचे विचार आचरणात आणणारे ते ज्ञानयोगी होते. जग हे जगन्नाथाचे निवासस्थान आहे. माणूस अमृताचा पुत्र, धर्म हा लोककल्याणाचा मंत्र आहे. वैज्ञानिक प्रगतीचे स्वागत करताना माणूस परमार्थापासून वंचित राहू नये म्हणून संस्कृतीची, आत्मज्ञानाची, अध्यात्माची महती पटवून देणारे विवेकानंद म्हणजे उत्कट विज्ञाननिष्ठा, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि धवल चारित्र्य यांचे मूर्तिमंत विश्वरूपदर्शन. युवक आणि देशनिष्ठा, देशभक्ती यासाठी ते स्फूर्तिदायी आहेत.

इ.स. १८९८मध्ये शिकागो येथे सर्व धर्मपरिषद भरली होती. भारताचे प्रतिनिधित्व स्वामींनी केले. हिंदू संस्कृतीला विश्वपातळीवर विराजमान केले. ‘बंधू-भगिनींनो…’ हे विश्वबंधुत्व आजही सर्वांना प्रेरणादायी आहे. खरा धर्म तो की, जो जीवाला पशुत्वाच्या पातळीवरून माणुसकीच्या जगात आणि माणसाला देव करील तो, असे ते म्हणत. अध्यात्म पारायण हेच भारतीय संस्कृतीचे सत्त्व. स्वामीजींनी भारताचे अवमूल्यन करू पाहणाऱ्या वृत्तीला विरोध होता. बुद्ध, महावीर, शंकराचार्य, रामकृष्ण यांची भूमी हे अखंड स्मरण होते.

परमहंस हे अाध्यात्म विद्येचे अभ्यासक होते. माणसाला अंतर्मुख करणारी, आत्मनिर्भर करणारी, आत्मानुभव देणारी अाध्यात्मविद्या हेच भारताचे खरे योगदान, असे विवेकानंद सांगत. भूमातेची उपासना हाच आमचा धर्म. आमचे वैभव पाहून अनेकांनी आमच्यावर चाल केली, घाव घातले.पण जन्मभूमी ही आमची जननी, तिच्या कुशीत राहून आम्ही विश्वात्मक देवाचे चिंतन केले, असे ते सांगायचे.
रामकृष्ण परमहंस यांची विवेकानंदांनी खूप सेवा केली. यांनी पैशाला कधी स्पर्श केला नाही. विवेकानंदांनी स्वतः धनसंचय केला नाही. भगवी वस्त्रे परिधान करून भारतयात्रा करणारे, वाटेत कुणी भेटला तर त्याला सांगत, ‘मित्रा, मी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -