Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीSwami Samartha : स्वामी ईश्वर दिगंबर; नको अवडंबर, पितांबर...

Swami Samartha : स्वामी ईश्वर दिगंबर; नको अवडंबर, पितांबर…

  • समर्थ कृपा : विलास खानोलकर

गणपतराव जोशी श्री स्वामी समर्थांच्या सहवासात व सेवेत होते; परंतु त्यांना श्री स्वामींचे देवत्व, अवतारित्व आणि सर्वसाक्षित्व पुरेसे कळले नव्हते. रूढ अर्थाने ते श्री स्वामींची सेवा करीत होते. श्री स्वामी हे निरिच्छ, निर्मोही, निसंग होते. त्यांना कुणी काही दिले तरी ते घेतीलच असे नव्हे. घेतलेच तर ते स्वतःजवळ, स्वतसाठी ठेवतीलच असेही नव्हे. त्यांना लहर आली, तर जे असेल, ते सर्व दुसऱ्यास देऊन टाकीत. ते सदैव दिगंबर अवस्थेत असल्याने ‘कौपिनवंत खलु भाग्यवंत’ हे वचनही त्यांच्यापुढे लटके पडावे, असे ते होते.

असे हे श्री स्वामी एके प्रातःकाळी अकस्मात गणपतराव जोशी यांच्या घरी आले. जोशींना खूप आनंद झाला. त्यांनी श्री स्वामींस स्नान घातले. त्यांची पूजा केली. त्यांना नैवेद्य अर्पण केला. त्यांना मोठ्या प्रेमाने पिवळा (पितांबर) मुकटा नेसवला व त्यांना भोजनास पाटावर बसविले. पण गणपतराव जोशांच्या मनात आले की, स्वामी महाराज आपण नेसवलेला हा किमती पिवळा मुकटा कोणास तरी देऊन टाकतील. अशा क्षणिक शंकेने गणपतराव मनातून बैचेन झाले. त्रिकालज्ञानी श्री स्वामींना गणपतराव जोशांची ही मानसिक अवस्था समजल्याचून कशी राहील? त्यांना जोशांचे वर्तन आवडले नाही. ते भोजन न करताच भरल्या ताटावरून उठले आणि म्हणाले, “हा घे तुझा मुकटा!” मुकटा सोडून दिगंबर अवस्थेत ते गणपतराव जोशांच्या घरातून निघून गेले.

दान, दक्षिणा आणि नैवेद्य करताना त्यावर ‘तुळशीपत्र’ ठेवूनच देण्याचा प्रघात आहे. कारण की ते देणे, निरपेक्ष, निर्हेतूक, निरलस असावे. एकदा एखादे दान दिले की, दात्याचा त्या दानाशी संबंध तुटतो. त्याचे पुढे काय करावयाचे ते घेणाऱ्याने ठरवावे. दात्याने त्याबाबत गाजावाजा, प्रसिद्धी, गर्व आदी करू नये. त्या दानाचे काय करावे, हेही सुचवू नये; परंतु बऱ्याचदा दान अथवा एखादी वस्तू देताना अथवा दानधर्म करताना प्रसिद्धी, अहंकार, स्वार्थ-लाभ-लोभ, घेणाऱ्यास मिंधे करण्याची भावना मनात निर्माण होते अथवा दात्याचा त्यामागे काही ना काही हेतू वा उद्देश असतो. असल्या दानाने कोणतेही पुण्य पदरी पडत नाही. ‘उजव्या हाताने केले जाणारे दान वा सत्कृत्य डाव्या हातालाही कळता कामा नये.’ असा अलिप्तपणा दात्यामध्ये असावा लागतो. असा दानाचा धर्म आहे. या लीलाकथेत गणपतराव जोशींकडून नकळत का होईना मुकट्याविषयी मनात विचार येण्याची चूक झाली होती. तीसुद्धा प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थाबाबत. हा विचार मनात आला म्हणून ते न जेवता व त्याचा मुकटा देऊन त्याच्या घरातून निघून गेले. पुढे तात्या वैद्य नावाच्या गृहस्थांनी श्री स्वामी भक्तिपूर्वक प्रार्थना करताच ते त्याच्या घरी भोजनास गेले. तात्या वैद्यास त्याची शुद्ध भक्ती कामी आली. म्हणून साधक-उपासक-भक्तांनी दान-दक्षिणा अथवा काही अर्पण करताना कसे असावे हेच श्री स्वामी महाराजांनी आपणास येथे प्रबोधित केले आहे.

श्रीकृष्णम् अर्पणम् अस्तू।
सदा सर्वदा स्वामी संमर्पणम् अस्तू।।
सदा स्वामीनाम घ्यावे, नंतर कार्य स्वामीचरणी वाहावे.

स्वामी नाम सोपे पुण्यवान

स्वामी भक्तांच्या मनात
भक्तांच्या स्वामी मनात ।।१।।
स्वामी साऱ्या जनात
स्वामी सेवेसाठी भक्त
तैनात ।।२।।
जसे देश सेवेसाठी भक्त सैन्यात
पालखी उचलण्यास भक्त जोमात ।।३।।
स्वामींचा संचार देशभरात
स्वामी जागृत दिनरात ।।४।।
शत्रू देई जेव्हा वात
स्वामी शत्रूखाली लावती बॉम्बवात ।।५।।
अनेक रोग्यांनी केली रोग मात
ठेवूनी स्वामींवरी श्रद्धा
नितांत ।।६।।
औषधउपचार हा अंतरबाह्य उपचार
परी मनी शांतता खरा
उपचार ।।७।।
मनी समाधान दुसरा उपचार
पहाटेच्या शांततेत
ओम उपचार ।।८।।
हरी ओम हरी ओम मन १ उपचार
स्वामी समर्थ स्वामी समर्थ २ उपचार ।।९।।
भिऊ नको पाठीशी स्वामी
३ उपचार
‘हम गया नही’ है जिंदा
४ उपचार ।।१०।।
ओम नमोः शिवाय ५ उपचार
श्री दत्तगुरू प्रसन्न
६ उपचार।।११।।
श्री भोलेनाथ प्रसन्न ७ उपचार
बम बम भोलेनाथ
८ उपचार।।१२।।
श्रीकृष्णम शरणम मम ९ उपचार
नवग्रह देई शांति मन १० उपचार ।।१३।।
श्री विष्णू दशावताराय नमः ११ उपचार
श्री प्रभू रामचंद्राय नमः १२ उपचार ।।१४।।
श्रीराम लक्ष्मणाय नमः
१३ उपचार
श्री सीताराम नमो नम:
१४ उपचार ।।१५।।
श्रीराम दशरथाय नमः
१५ उपचार
श्री हनुमंताय नमः
१६ उपचार ।।१६।।
श्री स्वामी समर्थाय नमः १७ उपचार
श्री दत्तप्रभू स्वामी समर्थाय नमः १८ उपचार ।।१७।।
नामाधिनाचे असता सोपे उपचार
कशास हवे होम यज्ञ
उपचार ।।१८।।
नको छाः छूः कोंबडा उपचार
नको बकरा, शेळी मेंढी
उधार ।।१९।।
स्वामींपुढे साधे सोपे नामोपचार
नाही कोठला खोटा
प्रचार ।।२०।।

vilaskhanolkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -