Sunday, May 12, 2024
Homeताज्या घडामोडीदोन दिवसात मोठं काहीतरी घडणार!

दोन दिवसात मोठं काहीतरी घडणार!

प्रकाश आंबेडकरांपाठोपाठ सुप्रिया सुळे यांचे खळबळजनक वक्तव्य

पुणे : बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पाठोपाठ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा महाराष्ट्रातील संभाव्य राजकारणात दोन दिवसात मोठं काहीतरी घडणार असल्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे काही आमदारांसह फुटून भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. राजकीय नेत्यांना जिथं-तिथं हेच प्रश्न विचारले जात आहेत. अजित पवार यांनी काल या चर्चा फेटाळल्या असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येत्या दोन दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

त्या पत्रकारांशी बोलत होत्या. येत्या दोन दिवसांत दोन मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असे त्या म्हणाल्या. त्यातली एक दिल्लीत होईल आणि दुसरी महाराष्ट्रात होईल, असे त्या म्हणाल्या.

अजित पवार हे भाजपसोबत जाणार का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर, ‘हा प्रश्न तुम्ही अजितदादांनाच विचारा. माझ्याकडे गॉसिप करण्यासाठी वेळ नाही. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहे. त्यामुळे या गोष्टींबद्दल मला फारशी माहिती नाही. अजितदादा हे काम करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल अशी विधाने केली जातात, अशी पुस्तीही सुप्रिया सुळे यांनी जोडली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -