Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाIPL 2024५ विकेट राखून सुपर जायंट्सचा मोठा विजयी

५ विकेट राखून सुपर जायंट्सचा मोठा विजयी

लखनऊच्या फिरकीपुढे हैदराबाद गारद

लखनऊ (वृत्तसंस्था) : लखनऊच्या कृणाल पंड्या, अमित मिश्रा आणि रवि बिश्नोई या फिरकी त्रिकुटासमोर हैदराबादचा संघ निष्प्रभ ठरला. अवघे १२२ धावांचे लक्ष्य लखनऊने ५ विकेट गमावून सहज गाठत यंदाच्या हंगामातील दुसरा विजय मिळवला.

सनरायझर्स हैदराबादने लखनऊला १२२ धावांचे माफक आव्हान दिले होते. ४२ धावांवर लखनऊचे २ फलंदाज माघारी परतले होते. लोकेश राहुल आणि कृणाल पंड्या यांनी चांगली भागीदारी करत लखनऊला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. लोकेशने ३५, तर पंड्याने ३४ धावा केल्या. मार्कस स्टॉयनीस आणि निकोलस पुरन यांनी नाबाद खेळी खेळत लखनऊला विजय मिळवून दिला. १६ षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात लखनऊने विजयी लक्ष्य गाठले. हैदराबादच्या आदील रशीदने सर्वाधिक २ बळी मिळवले. लखनऊने या सामन्यात सोपा विजय मिळवला. लखनऊने आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यातील दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला. शुक्रवारच्या या विजयामुळे लखनऊने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.

लखनऊ सुपर जायंट्सच्या फिरकीपुढे हैदराबादचे फलंदाजांची दाणादाण उडाली. निर्धारित २० षटकांत हैदराबादने ८ गड्यांच्या मोबदल्यात १२१ धावा केल्या. कृणाल पंड्या, अमित मिश्रा आणि रवि बिश्नोई या फिरकी त्रिकुटासमोर हैदराबादच्या फलंदाजांनी नांगी टाकली. कृणाल पंड्याने तीन विकेट घेतल्या. तर अमित मिश्राने दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. रवि बिश्नोईने एक विकेट घेतली. या तिन्ही फलंदाजांनी धावाही रोखल्या. कृणाल पंड्याने चार षटकांत अवघ्या १८ धावा दिल्या. तर रवि बिश्नोई याने फक्त १६ धावा दिल्या. अमित मिश्राने चार षटकांत २३ धावा दिल्या. हैदराबादच्या राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ३४ धावा केल्या. त्याला यश ठाकूरने बाद केले. अनमोलप्रित सिंगने ३१ धावांचे योगदान दिले. हैदराबादचे अन्य फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. हैदराबादच्या उर्वरित फलंदाजांमध्ये मयंक अग्रवालने ८, हॅरी ब्रूकने ३, वॉशिंग्टन सुंदरने १६ आणि आदिल रशीदने ४ धावा केल्या. उमरान मलिक आणि एडन मार्कराम यांना खातेही उघडता आले नाही. अब्दुल समदने १० चेंडूंत नाबाद २१ धावा केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -