मुंबई: उन्हाळा(summer) येताच त्वचेसंबंधित समस्या सुरू होतात. अशातच अनेकजण यापासून बचावाचा प्रयत्न करतात. मात्र अनेकदा आराम मिळत नाही. बरेचजण उन्हाळ्याच्या दिवसांत चेहऱ्यावर क्रीमचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का चेहऱ्यावर क्रीम लावणे उन्हाळ्याच्या दिवसांत चांगले असते की नाही ते. जर तुम्हाला हे माहीत नाही तर आण्ही या लेखात याबद्दल सांगत आहोत…
चेहऱ्यावर क्रीम लावणे योग्य?
उन्हाळ्यात त्वचेची देखभाल करणे थोडे कठीण असे. कडक उन्हामुळे सतत घाम येत असतो. यामुळे आपली त्वचा काळवंडते. अशातच चेहऱ्यावर क्रीम लावणे फायदेशीर ठरू शकते. तर काही लोकांना यामुळे नुकसानही होऊ शकते. उन्हाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. यापासून बचावासाठी तुम्ही चेहऱ्यावर क्रीम लावू शकता. मात्र काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.
या गोष्टींची घ्या काळजी
क्रीम धूळ आणि घाणीपासून त्वचेला वाचवण्याचे काम करते. मात्र लक्षात ठेवा की उन्हाळ्याच्या दिवसात खूप क्रीमचा वापर करू नका. यामुळे चेहऱ्यावर पुटकुळ्या आणि पिंपल्स येऊ शकतात. त्वचेच्या हिशेबाने क्रीमचा वापर करा. अनेकदा तेलकट त्वचेवर काही क्रीम सूट करत नाहीत यामुळे पिंपल्स आणि चेहरा आणखी तेलकट दिसू लागतो.
तेलकट त्वचेवरील उपचार
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही ऑईल फ्री क्रीम अथवा जेलचा वापर केला पाहिजे. जेव्हा क्रीमची निवड करा तेव्हा त्याच्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घ्या. कोणत्याही नव्या क्रीमचा वापर करण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट जरूर करा. चेहरा दिवसांतून २ ते ३ वेळा थंड पाण्याने जरूर धुवा.