Monday, January 20, 2025
HomeदेशLok Sabha Election 2024: २१ राज्यांतील १०२ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू

Lok Sabha Election 2024: २१ राज्यांतील १०२ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मतदान सकाळी ७ वाजता सुरू झाले आहे. काही जागांवर मतदान सकाळी ८ वाजता सुरू होत आहे. हे मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील. या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशमधील १०२ जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात १६ कोटींहून अधिक मतदाते आहेत.

लोकसभा निवडणूक यंदा सात टप्प्यात होत आहे. पुढे दुसरा टप्पा २६ एप्रिलला ८९, तिसऱ्या टप्प्यात ७ मेला ९४, चौथ्या टप्प्यात १३ मेमला ९६, पाचव्या टप्प्यात २० मेला ४९, सहाव्या टप्प्यात २५ मेला ५७ आणि सातव्या टप्प्यात एक जूनला ५७ लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. मतमोजणीचा निकाल ४ जूनला लागणार आहे.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीचा हा सगळ्यात मोठा टप्पा. पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत INDIA गठबंधनची परीक्षा असणार आहे. गेल्या वेळेस या १०२ जागांपैकी UPAने ४५ तर एनडीएने ४१ जागांवर विजय मिळवला होता.

पहिल्या टप्प्यात तामिळनाडूमधील सर्वाधिक ३९ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात १६ कोटी ६३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. पहिल्या टप्प्यात मोदी सरकारचे ११ मंत्री मैदानात आहेत तर ७ माजी मुख्यमंत्र्यांच्या भविष्याचा फैसलाही आज मतपेटीत कैद होईल.

या टप्प्यात नितीन गडकरी, किरेन रिजीजू, भूपेंद्र यादवसारखे दिग्गज उमेदवार मैदानात आहेत. कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे. लोकसभेच्या १०२ जागांसोबतच अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. आज १० राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील मतदानाचे काम पूर्ण होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -