Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीइंडिगो एअरलाईन्सच्या कामगारांचे काम बंद आंदोलन

इंडिगो एअरलाईन्सच्या कामगारांचे काम बंद आंदोलन

जवळजवळ २,२०० कामगारांचा यात समावेश

मुंबई : इंडिगो एअरलाईन्सच्या सगळ्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन पुकारलं आहे. जवळजवळ २,२०० कामगारांचा यात समावेश आहे. अतिरिक्त काम करुन घेणं, कामगारांची कमतरता असणं, सुट्ट्या न मिळणं, बढती न मिळणं अशा विविध कारणांसाठी कामगार वर्गाने काम बंद आंदोलन सुरु केलं आहे.

जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका कर्मचा-यांनी घेतली आहे. अनेकदा व्यवस्थापनाशी बोलूनही ते लक्ष देत नाहीत, आम्हांला कुठल्याही चर्चेत सहभागी करुन घेत नाहीत. आम्ही सहभागी होण्याचा प्रयत्न केला तर आमचे पास काढून घेतले जातात व परत दिले जात नाहीत, अशा प्रतिक्रिया कामगारांनी व्यक्त केल्या. मार्च-एप्रिलपर्यंत होणारी पगारातील बढती अजूनही न झाल्याबद्द्ल कामगारांनी नाराजी व्यक्त केली.

याआधी अशा प्रकारांमुळे एकाने आत्महत्या केली व दुस-याने आत्महत्या करत असताना त्याच्या पत्नीने त्याला रोखले, असं एक कामगार प्रतिनिधी म्हणाले. याबाबत कामगारांनी थेट इंडिगोचे सहाय्यक उपाध्यक्ष चार्नेल डिसूझा यांच्यावर आरोप केला आहे. त्यांच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांच्यामुळेच हा त्रास सहन करावा लागतोय, असं कामगारांचं म्हणणं आहे. या आंदोलनात ड्रायव्हर, लोडर, क्लीनर, कार्गोमधले इतर कर्मचारी यांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -