Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वStock Market : नवीन शेअर्स खरेदीसाठी वेट अँड वॉच...

Stock Market : नवीन शेअर्स खरेदीसाठी वेट अँड वॉच…

  • गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजाराची तेजी या आठवड्यात देखील कायम राहिली. पण मागील आठवड्यात झालेली तेजी ही अत्यंत मर्यादित होती. मी माझ्या मागील लेखात सांगितल्याप्रमाणे निर्देशांकात मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे पुढील काही काळात मोठे करेक्शन येणे अपेक्षित आहे. त्यामुळे येऊ शकणारे करेक्शन लक्षात घेऊनच गुंतवणूक करणे अपेक्षित आहे.

सध्या मध्यम मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची गती तेजीची आहे. त्यामुळे टेक्निकल अॅनालीसीसनुसार तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच तेजीचा व्यवहार करता येईल. मात्र मागील आठवड्यात झालेल्या हालचालींनंतर निर्देशांक ‘नो ट्रेड झोन’मध्ये आलेले आहेत. त्यामुळे नवीन शेअर्समध्ये खरेदी करण्यासाठी वाट पाहणेच योग्य ठरेल.
मागील काही महिन्यांत निर्देशांकात झालेल्या मोठ्या तेजीमुळे अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील फार मोठी वाढ झालेली आहे. अनेक शेअर्स उच्चांकाला असून अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील मोठे करेक्शन येणे अपेक्षित आहे. त्यामुळे जुन्या गुंतवणूकदारांनी प्रॉफीटमध्ये असलेल्या शेअर्समध्ये नफ्याचा स्टॉपलॉस लावूनच जुन्या शेअर्समधील गुंतवणूक होल्ड करणे अपेक्षित आहे.

अल्पमुदतीसाठी आलेन्बिक फार्मा, एनटीपीसी, टाटा कम्युनिकेशन, झोमॅटो यासह अनेक शेअर्सची दिशा तेजीची आहे. कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसिसनुसार अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा तेजीची असून सोने ५८८०० या पातळीच्यावर आहे. तोपर्यंत सोन्याची दिशा तेजीची राहील. पुढील आठवड्यासाठी निफ्टीची १९५५० ही महत्वाची पातळी असून जोपर्यंत ही पातळी तुटत नाही तोपर्यंत अल्पमुदतीत निफ्टीमध्ये आणखी वाढ होऊ शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करत असलेल्या गुंतवणूकदारांनी मोठ्या करेक्शनमध्ये कोणते शेअर्स घ्यायचे याचा विचार करून त्यानुसार आखणी करणे आवश्यक आहे. कोणतेही मोठे करेक्शन हे केवळ एक दोन आठवड्यात येत नसते आणि करेक्शन एकदम पूर्ण होत नसते. तेजी आणि मंदी होत कोणतेही करेक्शन येते. त्यामुळे पुढील काळात निर्देशांकाच्या प्रत्येक मोठ्या घसरणीत दीर्घमुदतीच्या शेअर्सचा विचार करता येईल.

करन्सी मार्केटकडे पाहता डॉलर हा गेले अनेक महिने ८३.३० ते ८०.५० या रेंज बाउंड अवस्थेत असून जोपर्यंत या पातळ्यांच्या मधून डॉलर बाहेर पडत नाही तोपर्यंत डॉलरमध्ये मोठी तेजी किंवा मंदी
येणार नाही.

निर्देशांकात पुढील काळात जर करेक्शन आले तर फंडामेंटल बाबतीत उत्तम असलेल्या कंपन्यांचा विचार करता येईल. आपण आजपर्यंत या सात वर्षांच्या लेखमालेत दीर्घमुदतीसाठी उत्तम म्हणून सांगितलेल्या सनफार्मा, झायदस वेलनेस, गोदरेज कन्झुमर प्रॉडक्ट, मॅरिको लिमिटेड, कॅम्स, एचडीएफसी बँक, एचडीएफसी एएमसी यांचा विचार करता येईल. फंडामेंटल अँनालिसीस केल्यावर तुम्हाला निर्देशांक महाग आहे कि स्वस्त आहे, याचा अंदाज येत असतो. साधारणपणे ज्यावेळी निर्देशांक हा महाग असतो त्यावेळी त्याला आपण निर्देशांक ‘ओवर व्हॅल्यू’ झाला असे म्हणत असतो. निर्देशांक ‘ओवर व्हॅल्यू’ असताना कमीत कमी जोखीम पत्करून अल्पकाळासाठी गुंतवणूक करणे आवश्यक असते व दीर्घमुदतीसाठी गुंतवणूक करावयाची असेल तर मात्र टप्प्याटप्प्याने सातत्याने शेअर खरेदी करत राहणे आवश्यक असते.

निर्देशांकाचे मूल्य हे जर स्वस्त असेल तर आपण निर्देशांक हा ‘अंडर व्हॅल्यू’ आहे असे म्हणतो. निर्देशांक ‘अंडर व्हॅल्यू’ असताना मध्यम तसेच दीर्घमुदतीसाठी गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होत असतो.

(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)

डॉ. सर्वेश सुहास सोमण.
(samrajyainvestments@gmail.com)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -