Tuesday, May 14, 2024
Homeताज्या घडामोडीछत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील चोरीला गेलेला 'तो' पुतळा सापडला

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील चोरीला गेलेला ‘तो’ पुतळा सापडला

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील (America) कॅलिफोर्निया (California) राज्यामधील सॅन होजे (San Jose) शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अश्वारुढ पुतळा चोरीला गेला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा वरचा भाग कापून तो चोरण्यात आला होता. तर, या पुतळ्याचा भाग असलेला अश्वच्या पायांकडील भाग तसाच होता.

हा पुतळा अमेरिकेतील एका कुप्रसिद्ध भंगार दुकानात सापडला आहे. संतापजनक बाब म्हणजे, या पुतळ्याला फोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. शिवरायांच्या या पुतळ्याचे वजन सुमारे २०० किलो इतके आहे. हा पुतळा उत्तर अमेरिकेतील सॅन होजे शहराला १९९९ मध्ये पुणे शहराकडून भेट स्वरुपात मिळाला होता.

तो येथील ग्वाडालूप रिव्हर पार्कमध्ये बसवण्यात आला होता. ३१ जानेवारीला या पुतळ्याची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. अखेर हा पुतळा अमेरिकेतल्या एका भंगाराच्या दुकानात सापडला असून हे दुकान बेकायदेशीर व्यवहारांसाठी कुप्रसिद्ध आहे. या दुकानातील कर्मचाऱ्यांनी तीन जण हा पुतळा घेऊन आल्याची माहिती पोलिसांना दिली.

त्यापैकी दोन पुरुष तर एक महिला होती. हे तिघे जण २९ जानेवारी रोजी हा पुतळा घेऊन या दुकानात आले होते. ९ फेब्रुवारी रोजी हा पुतळा या दुकानात दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी या दुकानावर धाड टाकली आणि पुतळा हस्तगत केला. मात्र, अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नसून आरोपींचा शोध सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -