Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीST Bus Tickets : एसटीची दणक्यात दिवाळी तर प्रवाशांचे निघणार दिवाळे!

ST Bus Tickets : एसटीची दणक्यात दिवाळी तर प्रवाशांचे निघणार दिवाळे!

तिकीट दरात झाली वाढ…

मुंबई : राज्यभरात सर्वांनाच किफायतशीर असणारा वाहतुकीचा पर्याय म्हणजे एसटी (ST Bus). पण दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने (Maharashtra State Road Transpot Corporation) आपल्या तिकीट दरात (Ticket rates) १० टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत सामान्य माणसाच्या खिशाला आणखी एक कात्री लागणार आहे. मंगळवार, ७ नोव्हेंबरपासून ही दरवाढ लागू होणार असून २७ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांत महागाई खूपच वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यांसोबत भाज्या, कपडे यांचेही दर वधारले आहेत. त्यानंतर आता एसटीचेही भाडे वाढल्याने सामान्य माणसाच्या चिंतेत भर पडली आहे. एसटीची ही दरवाढ साधी, जलद, निमआराम, साधी शयन आसनी, वातानुकूलित शिवाई, शिवशाही या बससाठी करण्यात आली आहे. दरवाढीतून अश्वमेध व शिवनेरीला वगळण्यात आले असून, या बसला पूर्वीचेच दर राहणार आहेत.

नवीन दरानुसार आता छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे प्रवास भाडे ५५५ तर छत्रपती संभाजीनगर ते मुंबई हे भाडे ९१५ रुपये असणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातून पुणे-मुंबईला जाण्यासाठी साध्या बससह शिवशाहीला देखील ५० ते १०० रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, एसटी महामंडळाने घालून दिलेल्या नियमांनुसार खासगी ट्रॅव्हल्स (Private Travels) कंपन्यांनीही दीडपट भाडेवाढ केली आहे. त्यामुळे खाजगी कंपन्यांची दिवाळीही दणक्यात साजरी होणार आहे. परंतु खासगी बसच्या तुलनेत एसटी बसची तिकीट दरवाढ कमी आहे. शिवाय महिलांना पन्नास टक्के सूट तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास याही एसटीच्या सुविधा कायम राहणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -