senior citizens : एसटीच्या मोफत प्रवासाला ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Share

मुंबई (वार्ताहर) : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना (senior citizens) एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानंतर एसटी प्रवासाला ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.

२६ ऑगस्ट २०२२ ते २० नोव्हेंबर २०२२ दरम्यान केवळ ८७ दिवसांत राज्यभरातून २ कोटी ०८ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास, तर ६५ ते ७५ वर्षांदरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. २५ ऑगस्ट, २०२२ रोजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ झाला होता. त्यानंतर २६ ऑगस्टपासून ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत प्रवासाला सुरुवात झाली होती. एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ हे नाव दिले असून या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.

या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर २६ ऑगस्ट २०२२ ते २० नोव्हेंबर २०२२ दरम्यान राज्यभरातून २ कोटी ८ लाख ६५ हजारांहून अधिक म्हणजे दररोज सरासरी २ लाख ३९ हजार ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र, तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे, असे चन्ने म्हणाले.

Recent Posts

Mumbai University Exams: लोकसभा निवडणुकीचा विद्यार्थ्यांना फटका; मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या

'असं' असेल नवे वेळापत्रक मुंबई : देशभरात निवडणुकांची (LokSabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात…

27 seconds ago

farmer scheme : शेतकऱ्यांना ‘या’ तीन योजना ठरताहेत वरदान; होणार चांगला फायदा

जाणून घ्या कोणत्या आहेत त्या योजना? मुंबई : कडकडीत ऊन व अवकाळी पाऊस अशा बदलत्या…

36 mins ago

Vande Bharat Metro: आता येत आहे वंदे भारत मेट्रो, रेल्वेने ट्रायल रनची तयारी केली सुरू

मुंबई: रेल्वेने गेल्या काही वर्षात वेगाने मॉर्डन होण्याची शर्यत लावली आहे. मॉर्डनायझेशनच्या या मार्गावर रेल्वेने…

2 hours ago

Success Mantra: जीवनात आनंद आणतात या छोट्या छोट्या सवयी, बदलून जाईल तुमचे आयुष्य

मुंबई: प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. कधी कधी लोक आपले लक्ष्य मिळवण्यासाठी संपूर्ण जोर लावतात…

3 hours ago

वाढत्या उन्हामुळे तुम्हालाही डोकेदुखीचा त्रास होत आहे का?

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराचे काही ना काही आजार सुरूच होता. यातील एक म्हणजे डोकेदुखी. आज…

4 hours ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २८ ते ४ मे २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, २८ ते ४ मे २०२४ आर्थिक लाभ मेष : सदरील काळामध्ये आपल्या बुद्धी-वाणीच्या विकासासह…

7 hours ago