Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणसावित्री नदीच्या काठावर संरक्षक कठड्यांच्या बांधकामाला वेग

सावित्री नदीच्या काठावर संरक्षक कठड्यांच्या बांधकामाला वेग

गॅबियन पद्धतीचे कठडे तकलादू

पोलादपूर (प्रतिनिधी) : २०२१ मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी पोलादपूर ते महाबळेश्वर रस्त्यालगतचे संरक्षक कठडे कोसळलेल्या ठिकाणी गॅबियन नेटवर्क स्ट्रक्चरने कठडे उभारण्याचे काम सुरू झाले आहे. याठिकाणी रानबाजिरे धरणापासून सावित्री नदीचे पात्र भरधाव वेगाने येऊन आदळत असल्याने या गॅबियन नेटवर्क स्ट्रक्चर पध्दतीचे कठडे आगामी काळात किती तग धरू शकतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

कुडपण येथे वऱ्हाडाचा टेम्पो गॅबियन नेटवर्क स्ट्रक्चर तंत्राच्या संरक्षक कठड्याला धडकल्यानंतर गॅबियन तंत्राच्या ठिकऱ्या उडवत दरीत कोसळून तीन जण ठार तर अनेकजण जखमी झाले होते. यामुळे हे तंत्र संरक्षक कठडे बांधण्याकामी कुचकामी असल्याचे स्पष्ट झाले होते. यापूर्वी येथे १०० मीटर्स लांबीची काँक्रीटची संरक्षक भिंत काही वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती. मात्र २०२१ च्या महापुरामध्ये ती वाहून गेली. आता या ठिकाणी गॅबियन नेटवर्क पद्धतीचे स्ट्रक्चर उभारून कठडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. याठिकाणी नदीपात्र आणि रस्त्यालगत तब्बल चार मीटरचा मोठ्या दगडांचा भराव करण्यात आला असून त्यावर दगड, गोटे, कपाऱ्या आणि खापऱ्यांची लोखंडी जाळीमध्ये बांधणी करून कठडा उभारला जात आहे. यामध्ये कोठेही सिमेंट काँक्रीटचा वापर करण्यात आला नाही. या पध्दतीचे काम टीकावू नसते. त्यामुळे पुन्हा पावसाळयात ते वाहून जाण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -