Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेपाणी साचणाऱ्या सखल भागात लावणार साइट पंप व पोर्टेबल पंप

पाणी साचणाऱ्या सखल भागात लावणार साइट पंप व पोर्टेबल पंप

महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची माहिती

ठाणे (प्रतिनिधी) : पावसाळ्यात शहरातील सखल भागात दरवर्षी ज्या ठिकाणी पाणी साचते, अशा ठिकाणी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी ठिकठिकाणी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पंप बसविण्यात येणार असून याबाबतची कार्यवाही आपत्कालीन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीदरम्यान दिली.

ठाणे महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र येथे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरातील सखल भागात ज्या ठिकाणी पाणी साचते अशा ठिकाणी पंप बसविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते, त्यानुसार आपत्कालीन विभागाच्या वतीने शहरातील खालील नमूद ठिकाणी साइट पंप तसेच पोर्टेबल पंप बसविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

यामध्ये शहरातील विटावा रेल्वे पुलाखाली, सिडको रेल्वे पूल, दादोजी कोंडदेव स्टेडियम, चिखलवाडी (भास्कर कॉलनी), रिव्हरवूड (खिडकाळी), पोलीस लाइन क्राईम ब्रॅच, पंपिंग स्टेशन नं. २ (भास्कर कॉलनी), संभाजी नगर व देबनार सोसायटी या ठिकाणी साइट पंप बसविण्यात येणार आहेत.

तर दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, वागळे प्रभाग समिती, आनंदनगर जिम, दत्तवाडी, भांजेवाडी, ठाणे महानगरपालिका मुख्यालय आपत्कालीन कक्ष, दशरथ कुटिर सोसायटी माजीवडा प्रभाग समिती, वाघबीळ गाव, लवकुश सोसायटी कोपरी, दाभोळकर चाळ आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम या ठिकाणी पोर्टेबल पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान अतिवृष्टीच्या काळात ठाणे महानगरपालिका हद्दीतील विविध भागात पाणी साचल्यास नागरिकांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या १८०० २२२१०८ या टोल फ्री आणि ०२२ २५३७१०१० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -