Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणकणकवली येथे उद्यापासून सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव

कणकवली येथे उद्यापासून सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली एमएसएमई मंत्रालयाचा उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या पुढाकाराने व केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली येथे २१ ते २३ मे या कालावधीत सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे स्टेशन रोडनजीक, कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर हे प्रदर्शन भरविले जाणार आहे. पूर्णत: मोफत प्रवेश असणाऱ्या या प्रदर्शनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. देशातील विविध उद्योजकांचे स्टॉल या प्रदर्शनात मांडले जाणार असून नवउद्योजकांना हे प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन २१ मे रोजी होणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठीभेटी या प्रदर्शन आणि विक्री मेळाव्यात असणार आहेत. होतकरू तरुणांना आपला उद्योगव्यवसाय करण्यासाठी बँकिंग लोन मेळावा, कोकणातील तरुण उद्योजकांना सरकारी कंपन्यांसोबत व्यवसाय करण्याची संधी या महोत्सवातून मिळणार आहे.

विक्रेता आणि खरेदीदार एकाच छताखाली आणण्याची कल्पना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आणली असून याचा फायदा उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन एमएसएमई मंत्रालय भारत सरकार यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -