Wednesday, May 22, 2024
Homeक्रीडाIPL 2024शुभमन गिल आता विराट आणि बटलरचा विक्रमही मोडणार!

शुभमन गिल आता विराट आणि बटलरचा विक्रमही मोडणार!

मुंबई : आयपीएल सुरु झाल्यापासून क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात शुभमन गिल हे नाव गुंजत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळीसोबतच शुभमनने ऑरेंज कॅपवरही कब्जा केला आहे. या मोसमात त्याने १६ सामन्यांत ८५१ धावा केल्या आहेत. यामुळे विराट कोहलीचा विक्रमही मोडण्याच्या तो तयारीत आहे. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक ९७३ धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे.

चौथ्या सामन्यात तिसरे शतक झळकावणारा पहिलाच खेळाडू

शुक्रवारी, क्वालिफायर-२ मध्ये ५ वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्स विरोधात १२९ धावांची तूफान खेळी केली. गिलने चौथ्या सामन्यात तिसरे शतक झळकावले. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.

प्लेऑफची सर्वोत्तम धावसंख्या

मुंबई विरोधात खेळताना २३ मे रोजी त्याने अवघ्या ४९ चेंडूत शतक झळकावले. १७ व्या षटकात १२९ धावांची इनिंग खेळून तो बाद झाला. ६० चेंडूत १२९ धावा करत गिलने आयपीएल प्लेऑफमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. त्याच्या आधी पंजाब किंग्जच्या वीरेंद्र सेहवागने २०१४ मध्ये सीएसके विरुद्ध १२२ धावा केल्या होत्या.

एका खेळीत ७ चौकार व १० षटकार

शुभमन गिलने १२९ धावांच्या खेळीत ७ चौकार व १० षटकार मारले. प्लेऑफमध्ये यापूर्वी कोणत्याही फलंदाजाने एवढे षटकार मारले नव्हते. त्याच्या आधी हा विक्रम ऋद्धिमान साहाच्या नावावर होता. त्याने २०१४ च्या फायनलमध्ये केकेआर विरुद्ध ८ षटकार ठोकले होते.

बटलरचा विक्रमही मोडणार का?

गिलने या मोसमात ७८ चौकार व ३३ षटकारांसह तब्बल १११ बाउंड्रीज मारल्या आहेत. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक चौकारांचा विक्रम जोस बटलरच्या नावे आहे. त्याने २०२२ मध्ये १२८ चौकार ठोकले होते. आता या हंगामातील अंतिम सामन्यात १८ चौकार मारून गिल हा विक्रम मोडू शकतो.

४ सामन्यांत तिसरे शतक

शुभमन गिलने गेल्या ४ सामन्यांत आयपीएलमधील तिसरे शतक ठोकले. अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला, याआधी विराट कोहली व जोस बटलरने ६ डावांत ३ शतके ठोकण्याचा विक्रम केला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -