Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023IND vs SL Record: श्रेयसचे ६ सिक्स, शमीचा पंच, भारत-श्रीलंका सामन्यात बनले...

IND vs SL Record: श्रेयसचे ६ सिक्स, शमीचा पंच, भारत-श्रीलंका सामन्यात बनले हे रेकॉर्ड

मुंबई: एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये गुरूवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळवण्यात आला. हा सामना भारतीय संघाने ३०२ धावांनी जिंकत इतिहास रचला. या विजयासह भारताने दिमाखात सेमीफायनलमध्ये एंट्री घेतली. या विजयाचा हिरो मोहम्मद शमी ठरला. त्याने ५ ओव्हरमध्ये १८ धावा देत ५ विकेट मिळवले.

या दमदार कामगिरीच्या जोरावर शमीने अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड आपल्या नावे केले. विश्वचषकात सर्वाधिक वेळा ४हून अधिक विके घेणारा गोलंदाज ठरला. तसेच विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला.

विश्वचषकात सर्वाधिक वेळा ४पेक्षा अधिक विकेट घेणारे गोलंदाज

मोहम्मद शमी – ७ वेळा
मिचेल स्टार्क – ६ वेळा
इमरान ताहीर – ५ वेळा

श्रीलंकेचा वनडेतील तिसरी कमी धावसंख्या

४३ वि द. आफ्रिका, पर्ल २०१२
५० वि भारत, कोलंबो २०२३
५५ वि भारत, मुंबई २०२३

एकाच विश्वचषकात सर्वाधिक वेळा ४ विकेट घेणारे गोलंदाज

४ – शाहीद आफ्रिदी, २०११
४- मिचेल स्टार्क, २०१९
३- मोहम्मद शमी, २०१९
३- एडम झाम्पा, २०२३
३ – मोहम्मद शमी, २०२३

वनडेत सर्वाधिक ५ विकेट घेणारे भारतीय

४- मोहम्मद शमी
३- जवागल श्रीनाथ
३-हरभजन सिंह

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -