श्रेयाचा आणि किचनचा काहीही संबंध नाही

Share

मुंबई:  झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेला ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. अशीच एक लोकप्रिय विनोदवीर श्रेया बुगडे जिच्यासाठी प्रेक्षकांना हसवणं तर सोपं आहे पण किचनमध्ये जाऊन जेवण बनवणं मात्र तितकंच कठीण. श्रेया आता प्रेक्षकांना हसवताना नाही तर चक्क किचनमध्ये जेवण बनवताना दिसणार आहे. हो, किचन कल्लाकारच्या आगामी भागात श्रेया महाराज म्हणजेच अभिनेता प्रशांत दामले यांच्यासाठी काही चमचमीत पदार्थ बनवताना दिसेल.

या कार्यक्रमात सहभागी कलाकारांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचा मित्रपरिवार सुद्धा सज्ज असतो. श्रेयाला सपोर्ट करण्यासाठी तिची आई ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहे, पण तिला सपोर्ट करताना तिच्या आईने हा एक मजेदार किस्सा सांगून श्रेयाची पोलखोल केली. श्रेया आणि किचनचा काहीही संबंध नाही असा खुलासा श्रेयाच्या आईने केला. कधी श्रेयाच्या घरी बाई आली नाही कि श्रेया मला फोन करून एखादा पदार्थ कसा करायचा हे विचारते? पण त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची नाव देखील तिला माहिती नसतात असं श्रेयाच्या आईने सांगितलं. त्यामुळे कार्यक्रमात आता श्रेया आपल्या पाककलेने महाराजांना खुश करू शकेल का? हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल. श्रेया नक्की कुठला पदार्थ बनवणार आणि तो फसणार कि चांगला होणार? विनोदप्रमाणेच जेवण बनवणं देखील श्रेयाला जमेल का? किचनमध्ये पाऊल ठेवल्यावर तिची काय तारांबळ उडणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर किचन कल्लाकारच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहेत.

Recent Posts

डॉ. बाबासाहेबांची बनवलेली घटना बदलणे शक्य नाही

काँग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना बदलली त्याचे काय? - नारायण राणे यांचा सवाल लांजा…

2 hours ago

तुम्ही Google Pay अथवा Phone pay चा वापर करता तर जरूर वाचा ही बातमी

मुंबई: भारतात ऑनलाईन पेमेंटची(online payments) क्रेझ वेगाने वाढत आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय आल्यानंतर…

2 hours ago

Rohit Sharma: आयुष्यात आधीही मी…आयपीएलमध्ये कर्णधारपद घेतल्यानंतर रोहित पाहा काय म्हणाला…

मुंबई: या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२४साठी आधीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता…

4 hours ago

Food Tips: ही ५ फळे खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी

मुंबई: फळे खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होते. फळांमध्ये ती…

5 hours ago

“भारत जोडो यात्रेचा समारोप ४ जूनला काँग्रेस ‘ढूंढो’ यात्रेने होईल”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा घणाघात बरेली : काँग्रेस पक्षाचे 'राजपुत्र' राहुल गांधी यांनी 'भारत…

5 hours ago

“शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी?

फोडाफोडीच्या राजकारणावर अजित पवारांचा सवाल पुणे : शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी,आम्ही केली की गद्दारी?…

5 hours ago