Monday, May 20, 2024
Homeक्रीडाShoaib Akhtar : शोएब अख्तरची भविष्यवाणी, सांगितले कोणता संघ जिंकणार वर्ल्डकप

Shoaib Akhtar : शोएब अख्तरची भविष्यवाणी, सांगितले कोणता संघ जिंकणार वर्ल्डकप

मुंबई: आगामी वर्ल्डकप २०२३ (icc world cup 2023) येत्या ५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे आणि या स्पर्धेतील फायनल सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. भारतीय संघ (indian team) वनडे वर्ल्डकपमध्ये आपल्या अभियानाची सुरूवात ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईमध्ये करत आहे.

२०२४ वर्ल्डकपच्या १ महिन्याआधी या वर्ल्डकपच्या विजेत्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे म्हणणे की आपल्या यजमानपदाखाली खेळणे आणि मीडियामध्ये चर्चेत असल्याकारणाने आगामी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ दबावात असणार आहे.

शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी

शोएब अख्तर म्हणाला की जगातील नंबर १ संघ पाकिस्तानसाठी खिताब जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. यामुळे गंभीर आर्थिक परिस्थितींचा सामना करणाऱ्या देशवासियांना सेलिब्रेशन करण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. भारताने २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आयसीसीचा कोणताही खिताब जिंकलेला नाही. शोएबने स्टार स्पोर्ट्सने आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटले की, पाकिस्तान भारतात एकदम एकटा असेल. त्यांच्यावर कोणताही दबाव नसेल. आपल्या यजमानपदाखाली आपल्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचा दबाव भारतावर असेल. आम्ही चांगला खेळ करू शकतो.

शोएब अख्तरने सांगितले कोणता संघ उचलणार वर्ल्डकप

शोएब अख्तर म्हणाला, सारे स्टेडियम भरलेले असतील आणि दोन अब्जाहून अधिक लोक टीव्ही आणि सोशल मीडियावर पाहतील. भारतीय माडियाही पाकिस्तानवर खूप दबाव टाकेल. ते याला महाभारत बनवतील. त्यांनी आधीच भारताला विजयी घोषित केले आहे. सामन्याआधी त्यांच्यावर दबाव असेल.

वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणार आहे. याआधी दोन्ही संघ रविवारी १० सप्टेंबरला आशिया चषकाच्या सुपर ४ सामन्यात खेळणार आहे आणि १७ सप्टेंबरला फायनलचा सामना रंगणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -