Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीढोल ताश्यांच्या गजरात शिवनेरी गडावर मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा

ढोल ताश्यांच्या गजरात शिवनेरी गडावर मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती

पुणे: आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवनेरी गडावर ढोल ताशांच्या गजरात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते प्रविण दरेकर यांच्यासोबत मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

शिवरायांच्या जन्मोत्सवासाठी पाळणा तयार करण्यात आला होता. या पाळण्याला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महिलांनी पारंपरिक वेश परिधान करुन पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा केला.
यावेळी शिवभक्तांनी अनेक साहसी खेळ सादर केले. तसेच पोलीस खात्याच्या बॅंड पथकाने राष्ट्रगीत सादर करुन मानवंदना दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -