‘देवमाणूस २’मध्ये शिवानी घाडगेची एन्ट्री

Share

मुंबई : देवमाणूस २ या मालिकेने प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेचं रंजक कथानक प्रेक्षकांची मन    जिंकतंय. प्रेक्षकांचा या मालिकेला सुरुवातीपासूनच खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि नटवर हाच देवमाणूस आहे.

आता देवमाणूस परत आला आहे म्हटल्यावर तो नेहमीप्रमाणे आपल्या बोलघेवड्या स्वभावाने बायकांना आपल्या  जाळ्यात ओढणार. अशातच त्याला एक सावज भेटलं आहे. गावात आलेल्या कॉट्रॅक्टरची बायको हिच्यावर नटवरची नजर पडली आहे. प्रोमो मध्ये या व्यक्तिरेखेचा चेहरा न दिसल्यामुळे सगळ्यांना उत्सुकता होती कि ही व्यक्तिरेखा नक्की कोण साकारणार आहे. आगामी भागात प्रेक्षकांना तो चेहरा पाहायला मिळणार आहे. ही भूमिका अभिनेत्री शिवानी घाडगे साकारतेय. शिवानी हिला प्रेक्षकांनी याआधी लगीर झालं जी या मालिकेत सुमन काकीच्या भूमिकेत पाहिलं होतं. आता या नव्या भूमिकेत शिवानीला पाहताना प्रेक्षकांना सुखद धक्का मिळणार आहे.

या नवीन भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, “मी देवमाणूस २ मध्ये गावात आलेल्या कॉन्ट्रॅक्टरची बायको नीलमची भूमिका साकारतेय. याआधी मी लगीर झालं जी मध्ये सुमन काकीची भूमिका साकारली होती. नीलम ही भूमिका सुमनच्या अगदी विरुद्ध आहे. सुमन ही अगदी साधी भोळी आहे याउलट नीलम ही गावातील स्त्री आहे. डॉक्टर देवची नजर ज्या स्त्रीवर पडते त्यांचं काय होतं हे प्रेक्षकांनी पाहिलंच आहे. त्यामुळे आता निलमचं काय होणार? नीलम डॉक्टरच्या जाळ्यात अडकणार का? हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.”

Recent Posts

जगात महिलांची पाटी कोरीच! पण भारतीय जनता पार्टीने दिली महिला उमेदवारांना सर्वाधिक संधी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत फक्त २३५ महिलांनाच मिळाले तिकीट नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा…

18 mins ago

Covishield Covid Vaccine : लस बनवणाऱ्या कंपनीने कोर्टात दिली कोरोना लसीचे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याची कबूली!

नवी दिल्ली : कोरोना काळामध्ये जगभरातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरलेल्या कोरोना लस निर्मिती करणा-या कंपनीने (Covishield…

41 mins ago

School Admission : शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी हे वाचा!

महाराष्ट्रात ६६१ तर मुंबईत १८६ बेकायदेशीर शाळा, नवी मुंबईतही ५ शाळा अनधिकृत नवी मुंबई :…

1 hour ago

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे महानालायक!

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेची बोचरी टीका मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी…

1 hour ago

suicide: पतीने खर्चासाठी आईला दिले पैसे, चिडलेल्या बायकोने दोन मुलांसह घेतली विहीरीत उडी

लखनऊ: उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथील एका महिलेने आपल्या दोन…

3 hours ago

Lok Sabha Election 2024: काँग्रेसला ६० वर्षात जमले नाही ते या सेवकाने १० वर्षात करून दाखवले – पंतप्रधान मोदी

मुंबई: महाराष्ट्रातील माढा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Pm narendra modi) आज निवडणुकीच्या प्रचाराची सभा घेतली. यावेळी…

4 hours ago