Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीPankaja Munde : 'त्या' गोष्टीमुळे ब्रेक घेतलेल्या पंकजा मुंडेंचा 'शिवशक्ती दौरा'; पुन्हा...

Pankaja Munde : ‘त्या’ गोष्टीमुळे ब्रेक घेतलेल्या पंकजा मुंडेंचा ‘शिवशक्ती दौरा’; पुन्हा राजकारणात येणार?

कसा असणार हा दौरा?

मुंबई : दोन महिन्यांपूर्वी वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झालेल्या बातमीमुळे राजकारणातून ब्रेक घेतलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आता देवदर्शनाच्या निमित्ताने ‘शिवशक्ती दौरा’ करणार आहेत. पंकजाताई भाजप (BJP) सोडून काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार आहेत व त्यांनी सोनिया गांधींची (Soniya Gandhi) भेट देखील घेतली, अशी ती बातमी होती. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता माध्यमांनी ही बातमी प्रसिद्ध केल्यामुळे पंकजाताई प्रचंड नाराज झाल्या होत्या. माझ्या प्रतिष्ठेवर सवाल उठवला गेला असा आरोप त्यांनी ही बातमी पसरवणार्‍या माध्यमांवर केला होता. या गोष्टीमुळे त्यांनी दोन महिने राजकारणातून ब्रेक घेतला. मात्र आता त्या पुन्हा सक्रिय होणार असून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या दहापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये दौरा करणार आहेत.

पंकजा मुंडे या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या आहेत. आजवर खूप मोठी संधी मिळालेली नसतानाही त्यांनी भाजपची साथ सोडली नाही. मात्र माध्यमांमध्ये होणार्‍या या चर्चेमुळे त्या दुखावल्या गेल्या होत्या. मी राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांपैकी कोणालाच भेटले नसून त्यावेळी मी भाजपच्या मध्यप्रदेशच्या कार्यालयात होते, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुट्टीवर असलेल्या पंकजा मुंडे या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या दहापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये दौरा करणार आहेत.

विशेष म्हणजे हा दौरा केवळ देवदर्शनासाठी असेल असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. या दौऱ्यामध्ये पाच हजार किलोमीटरचा प्रवास पंकजा मुंडे करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनापासून होणार आहे. त्यानंतर नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील देवदर्शनासाठी पंकजा मुंडे दौऱ्यावर जाणार आहेत.

राजकारणात कधी परतणार?

पंकजा मुंडे यांचा हा दौरा श्रावण मासामुळे महादेवांच्या म्हणजे शिवांच्या पूजेसाठी आणि त्यासोबत शक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गामातेच्या दर्शनासाठी असल्याने हा शिवशक्ती दौरा असल्याचे सांगितले जात आहे. हा दौरा केवळ देवदर्शनासाठी असेल असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ब्रेकवरुन परतलेल्या पंकजा मुंडे राजकारणात कधी सक्रिय होणार? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला आहे. पण, दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पंकजा मुंडे राजकीय घडामोडी विरहित दौरा करतील का? असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या या दर्शन दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -