Sunday, May 12, 2024
Homeमहत्वाची बातमी'बॅनर उद्धवजींचा, धूर राष्ट्रवादीतून'

‘बॅनर उद्धवजींचा, धूर राष्ट्रवादीतून’

'घरचा उपाशी, बाहेरचा तुपाशी'

शीतल म्हात्रे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात ट्विटरवर कलगीतुरा!

मुंबई : राज्यात इतर मुद्द्यांवरून राजकारण तापलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेमधील शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यात मात्र वेगळेच ट्विटर वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या एका व्हिडीओवरून मोठा वाद निर्माण झाला होता. या व्हिडीओवरून गंभीर आरोपही करण्यात आले. यावरून तापलेले राजकारण शमले असतानाच आता शीतल म्हात्रे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात पुन्हा ‘ट्विटर वॉर’ सुरू झाल्याचे दिसत आहे. रविवारी संध्याकाळपासून या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

शीतल म्हात्रेंनी २५ मार्च रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास उद्धव ठाकरे गटाच्या बॅनरचा एक फोटो ट्वीट केला होता. हा बॅनर उर्दू भाषेत छापला होता. “या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं होतं. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? हीच का तुमची हिंदुत्ववादी विचारधारा? उध्वस्त सेना.. खांग्रेसची चमचेगिरी”, असे ट्वीट शीतल म्हात्रेंनी केले होते.

उद्धव ठाकरेंच्या मालेगाव सभेसंदर्भातला हा उद्धव यांना डिवचणारा बॅनर होता. ते राहिले बाजुला आणि कायम वाद स्वत:च्या अंगावर ओढवून घेणारे जितेंद्र आव्हाड यांनी शीतल म्हात्रेंना प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे गटाचा एक बॅनर ट्वीट केला. हा बॅनरही उर्दू भाषेत असून त्यावर एकनाथ शिदेंसह अब्दुल सत्तार यांचाही फोटो आहे. “याच्यावर बोला ताई. खास तुमच्या माहितीसाठी. कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे”, असे ट्वीट आव्हाडांनी केले.

या ट्वीटवर पुन्हा शीतल म्हात्रेंनी प्रत्युत्तर दिले. “मुंब्र्यात कधीही शिवजयंती साजरी न करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना ट्वीट चांगलंच झोंबलेलं दिसतंय. पण मला एक समजत नाही, मी बॅनर उद्धवजींचा टाकलाय आणि धूर चक्क राष्ट्रवादीमधून आलाय”, असे ट्वीट शीतल म्हात्रेंनी केले.

त्यावर प्रत्युत्तरादाखल आव्हाडांनी केलेल्या ट्वीटमध्ये “मला काम करताना गवगवा करण्याची सवय नाही. लोकांसाठी कार्यक्रम करतो. माझ्या मतदारसंघात येऊन विचारा. उघड्यावर लाज घालवणारं कृत्य मी करत नाही. आठवतंय ना? काय दे ढुं**, काय तो दांडा.. धूर कुठून निघाला?” असा खोचक सवाल करण्यात आला.

दरम्यान, यावर पुन्हा एकदा शीतल म्हात्रे यांनी एक ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर दिले. “पवारांची भाकरी आणि उद्धवजींची चाकरी. लगे रहो भाईजान”, असे म्हात्रेंनी म्हटल्यानंतर त्यावर “त्याची चिंता आपल्याला नसावी. उगाचच बोलायला लावू नका. घरचा उपाशी, बाहेरचा तुपाशी”, असे खोचक ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -