Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीSharad Pawar group : शरद पवार गटाने जाहीर केली नवे नाव आणि...

Sharad Pawar group : शरद पवार गटाने जाहीर केली नवे नाव आणि चिन्हांची यादी

निवडणूक आयोग करणार एकाची निवड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी झाल्या. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे काका-पुतण्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. मात्र, अजित पवारांकडे बहुमत असल्याने निवडणूक आयोगाने (Election commission) निकाल अजितदादांच्या बाजूने दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळाचं चिन्ह अजितदादांना मिळाल्याने निवडणुका तोंडावर आल्या असताना शरद पवार गटाला प्रचंड मोठा धक्का बसला. आता नव्याने पक्ष उभारण्याची तयारी शरद पवारांनी सुरु केली आहे. नवे नाव व चिन्हांची यादी त्यांनी निवडणूक आयोगासमोर जाहीर केली आहे. यापैकी एकाची निवड होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालामुळे शरद पवार गट पक्ष राहिला नाही. आयोगाने शरद पवार यांना सांगितले की, ते त्यांचा नवा पक्ष स्थापन करण्यासाठी आयोगाला कोणतीही ४ नावे देऊ शकतात. त्यासाठी आयोगाने शरद पवार गटाला बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत मुदत दिली होती. दरम्यान शरद पवार गटाकडून निश्चित केलेल्या नाव आणि चिन्हांची यादी समोर आली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला आता नवी ओळख मिळणार आहे.

पक्षाचे नाव-

शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी, शरद स्वाभिमानी पक्ष

चिन्ह-

कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य

निकालानंतर अजित पवार कार्यकर्त्यांना काय म्हणाले?

दरम्यान पक्ष-चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना देवगिरीवर काल झालेल्या बैठकीत काही सूचना दिल्या आहेत. आपल्याला जनमताच्या आधारावर पक्ष-चिन्ह मिळालं, त्याचा मान राखा, असं अजित पवार म्हणाले. जाहीरपणे बोलताना वाद होईल, अशी वक्तव्ये टाळा. पक्ष-चिन्ह मिळाल्याचा आनंद असला तरी उन्माद होऊ देऊ नका. यापुढे अधिकाधिक लोकप्रतिनिधी कसे निवडून येतील, यासाठी जोमाने कामाला लागा, असं अजित पवार म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -