Wednesday, July 29, 2026

पुणेकरांना दिलासा

पुणेकरांना दिलासा

यंदाच्या मान्सूनने पुणे जिह्यावर विशेष कृपादृष्टी दाखवली असून शहराला पाणीपुरवठा करणारी प्रमुख धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत. खडकवासला धरण साखळीतील तसेच जिह्यातील इतर धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्यामुळे पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. त्याचबरोबर शेती, पर्यावरण, भूजल पातळी आणि जैवविविधतेवरही या जलसाठ्याचा सकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिक, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे शहराचा मुख्य पाणीपुरवठा खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणांमधून केला जातो. एल निनोचे संकट, महिनाभर लांबणीवर पडलेला पाऊस, धरणात शिल्लक पाणीसाठा अशा परिस्थितीमुळे शहरात पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यामुळे यंदा खडकवासला भरणार की नाही याबाबत भिती निर्माण झाली होती. मात्र, महिनाभरात झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील चारही धरणात समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे.या धरणांमध्ये यंदा मुबलक पाणी साठल्याने पुढील अनेक महिन्यांसाठी शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता जवळपास संपुष्टात आली आहे. गेल्या काही वर्षांत अपुऱ्या पावसामुळे पाणीकपात, पर्यायी दिवशी पाणीपुरवठा आणि टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ अनेक भागांवर आली होती. मात्र यंदा समाधानकारक पावसामुळे अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता कमी आहे.

धरणे भरल्याचा सर्वात मोठा फायदा शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या स्वरूपात होणार आहे. पुरेसा जलसाठा असल्यामुळे नियोजनबद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करणे प्रशासनाला शक्मय होईल. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्मयता कमी होईल. नागरिकांनाही पाण्याचा वापर अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करता येणार असून दैनंदिन जीवन अधिकसुलभ होईल. धरणे भरल्यामुळे भूजल पातळी सुधारण्यासही मोठी मदत होते. पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने विहिरी, कूपनलिका आणि झरे पुन्हा जिवंत होतात. अनेक ग्रामीण भागांमध्ये विहिरिंना मुबलक पाणी उपलब्ध होऊ लागते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही भूजलाचा वापर अधिक परिणामकारक ठरतो. भूजल पातळी वाढल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा धोका काही प्रमाणात कमी होतो. धरणसाठा वाढल्याने उन्हाळ्यातील संभाव्य पाणीकपात टाळण्यास मदत होणार आहे. वारजे, कोथरूड, सिंहगड रस्ता, हडपसर, कात्रज, नगर रस्ता आणि शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील पाणीपुरवठा अधिक नियमित करण्यासाठी प्रशासनाला नियोजन करता येईल. मात्र, धरण भरले म्हणजे प्रत्येक घरापर्यंत आपोआप समान पाणी पोहोचेलच असे नाही. जुन्या जलवाहिन्या, पाण्याची गळती, अपुरे वितरण-जाळे, अनधिकृत नळजोड आणि वेगाने वाढणारी लोकसंख्या या समस्या कायम आहेत. त्यामुळे महापालिकेने पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. धरणात भरपूर पाणी उपलब्ध झाले असले, तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. वाहन धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरणे, नळ सुरू ठेवणे, गळणारे नळ दुऊस्त न करणे आणि इमारतींच्या टाक्या भरून वाहू देणे यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. गृहसंस्था, शाळा, कार्यालये आणि उद्योगांनी पावसाचे पाणी साठविणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा बागा व स्वच्छतेसाठी पुनर्वापर करणे गरजेचे आहे. वाढता साठा ही दिलासादायक बाब असली, तरी पाणी जपून वापरण्याची जबाबदारी प्रत्येक पुणेकराची आहे. शहर आणि शेती यांच्यातील पाणीवाटप समतोल पद्धतीने करणे आवश्यक आहे. पुणे शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागातील शेती आणि पशुधनासाठीही पाणी आवश्यक आहे. म्हणून उपलब्ध पाण्याचा हिशेब ठेवून कालव्यांची दुऊस्ती, गळती रोखणे, ठिबक व तुषार सिंचनाचा वापर आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. धरणातील पाणी नियोजनाशिवाय सोडल्यास उन्हाळ्यात पुन्हा टंचाई निर्माण होऊ शकते. धरणे भरली असली तरी पाण्याचा योग्य वापर करणे अत्यावश्यक आहे. पाणी ही मर्यादित नैसर्गिक संपत्ती असल्यामुळे त्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पावसाचे पाणी साठवणे, पुनर्वापर करणे, गळती रोखणे आणि पाणी बचतीच्या सवयी अंगीकारणे यामुळे भविष्यातील पाणीसुरक्षेला बळकटी मिळेल. हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप अधिक अनिश्चित होत आहे. काही काळ अतिवृष्टी तर काही काळ दीर्घ कोरडे वातावरण अशी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे धरणे भरली असली तरी जलसंपत्तीचे वैज्ञानिक व्यवस्थापन, जलसंधारण आणि जलसंवर्धन या उपाययोजना सातत्याने राबवणे गरजेचे आहे.

पुणे शहरातील धरणे तुडुंब भरल्याने शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रŽश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. शेतीला आवश्यक सिंचन, भूजल पातळीत वाढ, पर्यावरणाचे संवर्धन आणि पर्यटनाला चालना अशा अनेक सकारात्मक परिणामांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही परिस्थिती केवळ आनंदाची नसून जलसंपत्तीचे संवर्धन आणि जबाबदारीने वापर करण्याची संधीही आहे. प्रशासन, शेतकरी आणि नागरिक यांनी एकत्रितपणे पाण्याचे योग्य नियोजन केले तर भविष्यातील पाणीटंचाई टाळणेशक्य होईल आणि पुण्याचा शाश्वत विकास अधिक मजबूत होईल. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे मागच्या वर्षीएवढी पाणीसाठ्याची सरासरी गाठली आहे. त्यामुळे पुण्यावरील जलसंकट टळले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा