Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील एका हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शेअर मार्केट घोटाळाप्रकरणी गुन्ह्यात प्राप्त मागणी तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई टाळण्यासाठी पैशांची केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार दिनेश राठोड याला निलंबित केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मंगळवारी रात्री उशिराने कारवाईचा आदेश काढला.
Nashik : पैसा कमवण्यासाठी लोक मोठी मेहनत करतात. कधी कधी तर एकाच वेळी दोन ते तीन नोकऱ्या सांभाळतात. पैसा कुठून येईल यासाठी नेहमीच धडपड करतात. अर्थात जेवढ्या ...
नेमकं प्रकरण काय ?
जिल्ह्यातील शेवगाव मार्केट घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये यशवंत साहेबराव पाटेकर यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती आणि या तक्रारींची चौकशी करण्याची जबाबदारी पोलिस हवालदार दिनेश राठोड याच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र चौकशी करण्याऐवजी, कारवाई टाळण्यासाठी पाटेकर यांच्याकडे त्याने पैशांची मागणी केली.
Panjab : NEET 2026 परीक्षेत ७२० पैकी तब्बल ७१५ गुण मिळवून ऑल इंडिया रँक-१ (AIR 1) पटकावणारा पंजाबचा आर्यन गुप्ता हा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. देशभरात सुरू असलेले NEET ...
यासंदर्भात, तक्रारदार यांनी राठोड व पोलिस उपअधीक्षक गणेश उगले यांच्याविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. या तक्रारींची चौकशी करण्यात आली. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे पाटेकर यांनी कारवाईबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागविली. याचदरम्यान राठोड याचा चारचाकीतून बसून पैसे घेतानाचा एक व्हीडीओ व्हायरल झाला. आणि या व्हिडीओची दखल घेऊन राठोड याला निलंबित करण्यात आले.
पोलिस हवालदार राठोड गेल्या १२ वर्षांपासून आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होता. त्यामुळे त्याने या विभागात चांगलेच बस्तान बसवल्याचे दिसून येते. अधिकारी बदलले तरी मात्र तो तेथेच काम करत असल्याने त्याला बारकावे माहित होते. दरम्यान आता पोलिस खात्यातील कोण कोणत्या अधिकाऱ्यांचा त्याला आर्शिवाद होता, याचीही चौकशीची मागणी होत आहे.






