Nashik News : नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक-पेठ महामार्गावरील दिंडोरी तालुक्यातील (Dindori) रासेगाव (Rasegaon) येथे असलेल्या ‘स्पेक्ट्रम इथर्स’ या रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या कंपनीत मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, आग लागल्यानंतर कंपनीत गॅस गळती झाल्याची अफवा पसरल्यामुळे कामगारांची मोठी धावपळ उडाली. या घटनेत दोन कामगार जखमी झाल्याची माहिती आहे.
अमरावती : अमरावतीच्या वलगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कबूतर चोरीच्या आरोपावरून दोन जीवलग मित्रांची हत्या केल्याची धक्कादायक ...
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी नेहमीप्रमाणे काम सुरू असताना कंपनीत अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीचे स्वरूप सुरुवातीला किरकोळ होते, मात्र कंपनीतून धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने आणि आत गॅस गळती झाल्याची चर्चा पसरल्याने परिसरात कमालीची घबराट निर्माण झाली. जीव वाचवण्यासाठी कामगारांनी बाहेर पडण्यासाठी एकच पळापळ केली, ज्यामध्ये काही कामगार किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस ठाण्याचे (Dindori Police Station) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यासोबतच अग्निशमन दलाच्या गाड्यांनीही घटनास्थळी धाव घेत आग विझवली.
Karnataka: भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (ASI) अलीकडील संशोधनाने इतिहासकारांना आणि संशोधकांना आश्चर्याच्या गर्तेत ढकलले आहे. कर्नाटकातील मांड्या आणि ...
दिंडोरीचे तहसीलदार आणि प्लांट हेड यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझवण्यात आली असून ड्रम प्रेशराईज होऊन फुटल्याने आग लागली होती. 15-20 मिनिटांमध्ये ही आग विझविण्यात आली असून घटनेत दोन व्यक्ती जखमी झाल्याने ( Burn Injury) त्यांना वेदांता रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलेले आहे.






